ममता बॅनर्जींच्या विश्वासातील नेत्याला चिटफंड घोटाळयात अटक
By admin | Published: January 3, 2017 04:00 PM2017-01-03T16:00:54+5:302017-01-03T16:30:35+5:30
सीबीआयने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंडयोपाध्याय यांना अटक केली.
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 3 - रोझ व्हॅली चिट फंड घोटाळयात सीबीआयने मंगळवारी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंडयोपाध्याय यांना अटक केली. कोलकाता येथील कार्यालयात चौकशी केल्यानंतर सीबीआयने सुदीप बंडयोपाध्याय यांना अटक केली.
सुदीप बंडयोपाध्याय हे ममता बॅनर्जी यांच्या निकटच्या वर्तुळातील नेत्यांपैकी एक आहेत. या घोटाळयाप्रकरणी तृणमूलचे आणखी एक खासदार तापस पाल पोलिस कोठडीत आहेत. बंडयोपाध्याय यांनी आरोप फेटाळून लावताना केंद्र सरकारने आपल्या विरुद्ध आणि तृणमूल विरुद्ध राजकीय षडयंत्र रचल्याचा आरोप केला आहे. रोझ व्हॅली चिटफंड घोटाळयाची ईडीनेही चौकशी केली आहे. शारदा चिटफंडपेक्षा हा मोठा घोटाळा असल्याचे बोलले जाते.