ममता कुलकर्णी ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी, लवकरच होणार अटक?

By admin | Published: June 18, 2016 01:37 PM2016-06-18T13:37:55+5:302016-06-18T15:22:49+5:30

बॉलीवूडमधील प्रसिद्ध असणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे सबळ पुरावे पोलिसांना मिळाले आहेतय

Mamta Kulkarni participates in drug racket, will be arrested soon? | ममता कुलकर्णी ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी, लवकरच होणार अटक?

ममता कुलकर्णी ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभागी, लवकरच होणार अटक?

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - नव्वदच्या दशकात चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध असणारी अभिनेत्री ममता कुलकर्णी हिचा ड्रग्ज रॅकेटमध्ये सहभाग असून पोलिसांकडे तिच्याविरोधात असलेल्या सबळ पुराव्यांच्या आधारे तिला लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. शनिवारी दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत ठाणे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांनी ममताविरोधातील अनेक पुराव्यांसदर्भात माहिती दिली. 
( अभिनेत्री ममता कुलकर्णीला पतीसह अटक)
 
( अमली पदार्थ तस्करी प्रकरणी ठाणे पोलिसांची ममता कुलकर्णीवर नजर) 
 
२८ एप्रिल रोजी पोलिसांनी सोलापूरमध्ये छापा टाकून  20 टन इफेड्रीन ड्ग्ज जप्त केले होते. या आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ (ड्ग्स) तस्करीमध्ये ममता कुलकर्णीचा समावेश असल्याचा संशय पोलिसांना होता, त्याप्रकरणी अधिक तपास केला असता ममता व तिचा पती विकी गोस्वामी भारतात ड्रग्जची तस्करी करत असल्याचे सबळ पुरावे हाती आले असून यांसदर्भात होणा-या अनेक बैठकीसही ममता उपस्थित असायची. तसेच तिच्या नावावर ११ लाखांचे शेअर्स असून तिचे वर्सोवा येथे ४ फ्लॅट्सही आहेत. ड्रग्ज तस्करी प्रकरणात ममता आरोपी असल्याचे साक्ष दोन साक्षीदारांनी कोर्टात दिल्याचेही पोलिसांनी सांगितले. पोलिस सध्या तिची सर्व मालमत्ता व बँक अकाऊंट्सची कसून तपासणी करत आहेत. 
 
दरम्यान सध्या ममता व तिचा पती विकी गोस्वामी हे दोघेही केनियामध्ये असून लवकरच त्यांच्याविरोधात रेट कॉर्नर नोटीस जारी करण्यात येणार आहे. विकी गोस्वामीविरोधात इंटरपोल नोटीस काढलेली असल्याने तो केनिया सोडून जाऊ शकत नाही. यामुळेच त्याने ममता कुलकर्णीला दुबई, सिंगापूर, दक्षिण अफ्रिका आणि अमेरिकेतील आपल्या ग्राहकांना भेटण्यास सांगितले होते अशी माहिती समोर आली आहे. ममता कुलकर्णीने महाराष्ट्रातदेखील अमली पदार्थ तस्करी केली आहे. विकी गोस्वामी बँकांचे व्यवहार करण्यासाठी ममता कुलकर्णीच्या नावाचा वापर करत होता. अमली पदार्थ तस्करीच्या माध्यमातून मिळालेला पैसा या दोघांनी हवालाच्या सहाय्याने आपल्या बँक खात्यात जमा केला होता.  पण ममता आजपर्यंत पोलिसांच्या रडारवर आली नव्हती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भारत, पोलंड आणि युरोपातील काहीजण हा माल गुजरातमार्गे मुंबईतून पूर्व युरोपला पाठवण्याची योजना आखली होती.  देश-विदेशात इफेड्रीन या अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्सेस लि. या कंपनीचा मालक तसेच दोन हजार कोटींच्या या व्यवहारातील प्रमुख आरोपी मनोज जैन (४६) , सल्लागार पुनित श्रींगी (४६) आणि मालाचा देशभरात पुरवठा करणारा हरदीपसिंग इंदरसिंग गिल (४२) या तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली होती.
 
 

Web Title: Mamta Kulkarni participates in drug racket, will be arrested soon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.