राष्ट्रगीत, वंदेमातरम् म्हणणारे ममतांना घुसखोर वाटतात : नरेंद्र मोदी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2019 03:10 PM2019-05-16T15:10:36+5:302019-05-16T15:21:19+5:30
ममता बनर्जी ह्या निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचा आरोप सुद्धा मोदींना यावेळी केला.
नवी दिल्ली - भाजप अध्यक्ष अमित शहांच्या रोड शो दरम्यान झालेल्या राड्यानंतर पश्चिम बंगाल हे देशाच्या राजकरणाचा केंद्रबिंदू बनला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याप्रकरणी मुख्यमंत्री ममता बनर्जी यांच्यावर निशाना साधला. बाहेरील देशातून येणारे घुसखोर टीएमसीवाल्याना दिसत नाही. मात्र, देशातील राष्ट्रगीताचा सन्मान करणारे त्यांना घुसखोर वाटतात असा टोला मोदींनी यावेळी लगावला. ते एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
विरोधीपक्ष निवडणुकीत अस्तीत्व टिकवून ठेवण्यासाठी खालच्या पातळीवर जाऊन बोलत आहे. खोटा प्रचार करून मला शिव्या देण्याच्या काम विरोधीपक्ष मधील नेते करत असल्याचा आरोप मोदींनी केला. बाहेरून येऊन देशात घुसखोरी करणारे ममता बनर्जी यांना कधीच दिसले नाही. मात्र, राष्ट्रगीत व वंदेमातरम् बोलणारे त्यांना घुसखोर वाटायला लागले. असा आरोप मोदींनी केला.
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीपेक्षा तिथे झालेल्या हिंसाचाराची जास्त चर्चा आहे. आधीच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्यावेळी सुद्धा हिंसाचाराच्या घटना समोर आल्या होत्या, याची आठवण मोदींनी यावेळी करून दिली. ममता बनर्जी ह्या निवडणूक आयोगावर दबाव आणत असल्याचा आरोप सुद्धा मोदींनी यावेळी केला.
२०१४ निवडणुकीच्यावेळी भाजपला बहुमत मिळणार नाही असे बोलणारे चुकीचे ठरले. आताच्या निवडणुकीत भाजपला पाचव्या आणि सहाव्या टप्प्यातच बहुमत मिळाले आहे. पश्चिम बंगाल मधील होणाऱ्या मतदानामुळे आम्ही ३०० चा आकडा पार करू असा विश्वास मोदींनी यावेळी व्यक्त केला.