डॉक्टरांच्या आंदोलनस्थळी ममतांची अचानक भेट; पुन्हा कामावर परतण्याचे केले आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2024 05:33 AM2024-09-15T05:33:44+5:302024-09-15T05:34:05+5:30

आंदोलक डॉक्टरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

Mamta's sudden visit to the doctor's protest site; Appealed to return to work | डॉक्टरांच्या आंदोलनस्थळी ममतांची अचानक भेट; पुन्हा कामावर परतण्याचे केले आवाहन

डॉक्टरांच्या आंदोलनस्थळी ममतांची अचानक भेट; पुन्हा कामावर परतण्याचे केले आवाहन

कोलकाता : आर. जी. कार रुग्णालयात महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्येच्या निषेधार्थ  निदर्शने करणाऱ्या डाॅक्टरांची पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी अचानक आंदोलनस्थळी जाऊन भेट घेतली. त्यांच्या मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन देतानाच  डॉक्टरांनी पुन्हा कामावर रुजू व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

आंदोलक डॉक्टरांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आश्वासनही त्यांनी दिले.

थेट प्रसारणास नकार

पश्चिम बंगाल सरकारने शनिवारी संध्याकाळी सहा वाजता डॉक्टरांच्या प्रतिनिधींना चर्चेसाठी बोलावले होते. महिला डॉक्टरवरील बलात्कार व हत्या प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने या बैठकीचे थेट प्रसारण करणे शक्य नाही, असे ममतांनी सांगितले. त्यामुळे बैठक वेळेवर सुरु होऊ शकली नव्हती.

Web Title: Mamta's sudden visit to the doctor's protest site; Appealed to return to work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.