धक्कादायक! पत्नी आणि तीन मुलींची हत्या करून पतीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2018 08:52 AM2018-08-21T08:52:03+5:302018-08-21T09:32:03+5:30
उत्तरप्रदेशच्या अलाहाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
अलाहाबाद - उत्तर प्रदेशच्या अलाहाबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नी आणि तीन मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (20ऑगस्ट) दुपारी हा संपूर्ण प्रकार घडला. मनोज कुशवाहा असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव असून तो पत्नी आणि तीन मुलींसोबत राहत होता. मात्र खूप वेळ त्याच्या घराचा दरवाजा बंद असल्याने शेजारच्यांना शंका आली आणि त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.
Police recovered bodies of a man,his wife & three daughters from a locked house in Allahabad last night. Body of the man was found hanging, his wife's body was found inside the fridge, bodies of two daughters were found in suitcase & almirah and one daughter was found in the room pic.twitter.com/c6GIR405J1
— ANI UP (@ANINewsUP) August 21, 2018
घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरवाजा बंद असल्याने त्यांनी तो तोडून घरात प्रवेश केला. मात्र घरामध्ये पोलिसांना मनोज गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. तसेच त्याची पत्नी श्वेताचा मृतदेह हा फ्रिजमध्ये, मोठी मुलगी प्रीतीचा मृतदेह कपाटात, मधली मुलगी शिवानीचा मृतदेह सुटकेसमध्ये तर सर्वात लहान असलेल्या तीन वर्षीय श्रेयाचा मृतदेह हा जमिनीवर पडलेला आढळला. पोलिसांनी हे पाचही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मनोजने पत्नी आणि मुलींची हत्या करून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
Prima facie, it seems that the man killed his wife and daughters, and later committed suicide. Investigation underway: Allahabad SSP Nitin Tiwari on bodies of 5 people found at a locked in Dhumanganj last night. pic.twitter.com/7iVJK8NuUK
— ANI UP (@ANINewsUP) August 21, 2018