सुप्रीम कोर्टासमोर महिला आणि पुरुषाचा आत्महदनाचा प्रयत्न, थोडक्यात वाचला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 04:20 PM2021-08-16T16:20:16+5:302021-08-16T16:27:27+5:30
man and woman set themself on fire: सध्या दोघांनाही हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
नवी दिल्ली:दिल्ली सुप्रीम कोर्टाबाहेर एका महिला आणि पुरुषानं पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुप्रीम कोर्टाच्या गेट नंबर डी समोर या दोघांनी स्वत:ला पेटवून घेतलं. या घटनेनंतर गेटवरील सुरक्षा रक्षकांनी तातडीनं आग आटोक्यात आणत त्या दोघांना राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या त्या दोघांवर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला आणि पुरुषाला सर्वोच्च न्यायालयात प्रवेश करायचा होता. पण, ओळखपत्र नसल्यामुळं सुरक्षा रक्षकांनी त्यांना न्यायालयाच्या आवारात प्रवेश दिला नाही. त्यामुळे दोघांनी सर्वोच्च न्यायालयाच्या गेटसमोरच स्वतःला पेटवून घेतलं.
सुप्रीम कोर्टासमोर अचानक एका महिला आणि पुरुषाने स्वतःला आग लावून घेतल्याची घटना घडताच परिसरात एक गोंधळ उडाला. त्या दोघांनी आग लावून घेताच सुरक्षा रक्षक आणि परिसरातील इतर लोकांनी ही आग आटोक्यात आणली. या घटनेत दोघेही भाजले असून, त्या दोघांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.