बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींना धमकावणारा निघाला 'भक्त', सांगितलं धक्कादायक कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 05:49 PM2023-01-24T17:49:49+5:302023-01-24T17:49:57+5:30
बागेश्वर धाम येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अमन सिंग असे त्या व्यक्तीचे नाव आहे.
बागेश्वर धाम येथील धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. अमन सिंग असे त्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांच्या चौकशीत तो व्यक्ती धीरेंद्र शास्त्रींचा भक्त असल्याचे समोर आले आहे. त्याची शास्त्री यांना भेटण्याची इच्छा आहे. भेटण्यासाठी अपयश येत आल्यानंतर संतप्त होऊन त्याने धमकी दिली. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक चौकशी करत असून पुढील कारवाई करत आहेत.
काळा, पिवळा आणि लाल...धीरेंद्र शास्त्री यांच्या दरबारातील कलर कोड; अपॉइनमेंटची प्रक्रिया आहे अशी
'आरोपी काही अडचणीत होता आणि त्याला महाराजांना भेटायचे होते. बराच वेळ त्याला भेटू दिले नाही. हेच कारण त्या आरोपीने सांगितले आहे. आरोपीविरुद्ध आयपीसी कलम ५०६ आणि ५०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
धीरेंद्र शास्त्री यांच्या चुलत भावाने छतरपूरच्या बमिठा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली होती. 22 जानेवारी रोजी रात्री 9.15 च्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर एका व्यक्तीने कॉल केला. धीरेंद्र शास्त्री यांच्याशी बोलण्यास सांगितले. तो बोलू शकत नाही, असे सांगताच कॉलरने धमकावले, असंही पोलिसांनी सांगितले.
गेल्या काही दिवसापासून धीरेंद्र शास्त्री चर्चेत आहेत. यादरम्यानच त्यांना धमकी आली आहे. त्यामुळे पोलिसांनी आरोपी ताब्यात घेऊन चौकशी केली.