Jamia Protest : दिल्लीतील जामिया विद्यापीठात गोळीबार, एक जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2020 02:59 PM2020-01-30T14:59:34+5:302020-01-30T15:00:24+5:30
Jamia Protest : दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला.
नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला आता हिंसक वळण लागू लागले आहे. दरम्यान, दिल्लीतील जामिया विद्यापीठात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. यामध्ये एक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार गोळीबार करणारी व्यक्ती बाहेरून आली होती. तसेच त्याने तुम्हाला आझादी हवी आहे ना मी देतो तुम्हाला आझादी, असे म्हणत त्याने गोळीबार केला. तसेच दिल्ली पोलीस झिंदाबाद, जामिया मिलिया मुर्दाबाद अशा घोषणाही हा तरुण देत होता.
दरम्यान, गोळीबारात जखमी झालेला तरुण हा जामिया मिलियाचा विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमी विद्यार्थ्याचे नाव शादाब असल्याचे समोर आले आहे.
#UPDATE Delhi Police: Man, who brandished the gun and opened fire in Jamia area, has been taken into custody. He is being questioned. The injured, said to be a student, has been admitted to a hospital. Investigation is continuing. https://t.co/6Mh2021fyw
— ANI (@ANI) January 30, 2020
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात जामिया मिलियाच्या विद्यार्थ्यांनी जामिया विद्यापीठापासून राजघाटापर्यंत मोर्चा काढला होता. दरम्यान, गोळीबाराची घटना घडल्यानंतरही मोर्चा सुरू ठेवण्यात आला. तसेच यावेळी मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आलेला होता.