Video - 10 रुपयांची नाणी घेऊन ‘तो’ पोहोचला स्कूटर घ्यायला; पैसे मोजताना कर्मचाऱ्यांच्या नाकीनऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 06:08 PM2022-10-27T18:08:07+5:302022-10-27T18:12:15+5:30
तरुणाने स्कूटरच्या डाऊन पेमेंटच्या नावावर शोरूममध्ये 10 रुपयांची 5 हजार नाणी दिली. यानंतर शोरूमच्या कर्मचाऱ्यांचा नाणी मोजतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
यंदा दिवाळी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरी केली जात आहे. या काळात लोकांनी टू व्हीलर्स आणि कार खरेदी केली. मात्र याच दरम्यान एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. उत्तराखंडमधील रुद्रपूर येथे राहणारा एक तरुण बॅगमध्ये नाणी भरून टीव्हीएस ज्युपिटर स्कूटर घेण्यासाठी शोरूममध्ये पोहोचला. या तरुणाने 10 रुपयांच्या नाण्यांसह 50 हजार रुपयांचे डाऊन पेमेंट केले. तरुणांचे पैसे भरताना शोरूमचे अनेक कर्मचारी ही नाणी मोजताना दिसले.
तरुणाने स्कूटरच्या डाऊन पेमेंटच्या नावावर शोरूममध्ये 10 रुपयांची 5 हजार नाणी दिली. यानंतर शोरूमच्या कर्मचाऱ्यांचा नाणी मोजतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. डीएनएच्या वृत्तानुसार, दिवाळीच्या खरेदी दरम्यान ही घटना घडल्याचं म्हटलं जात आहे. मात्र तरुणाची ओळख पटू शकलेली नाही.
Customer paid 50k in coins to buy TVS Jupiter scooter at TVS showroom in Rudrapur. pic.twitter.com/lzkOMCABP8
— Lakshya Rana (@LakshyaRana6) October 24, 2022
कॅश पेमेंट कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर नाही, परंतु जेव्हा जेव्हा असं प्रकरण समोर येतं, जेव्हा लोक नाणी किंवा नोटांमध्ये मोठ्या प्रमाणात पेमेंट करतात तेव्हा डीलर्स ते घेण्यास टाळतात. याचे कारण म्हणजे एवढी रक्कम मोजणे आणि नंतर ती हाताळून बँकेत जमा करणे हे मोठे काम होतं. त्याच वेळी, कायद्याने दोन लाख रुपयांपर्यंतच्या पेमेंटवर कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही. तथापि, यापेक्षा जास्त रोख रक्कम भरल्यास, 1% टॅक्स भरावा लागेल. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"