दिल्ली-तिरुपती एक्स्प्रेसच्या एसी कोचमध्ये झुरळांचा धुमाकूळ; फोटो शेअर करत प्रवाशाने केली तक्रार, रेल्वेचे उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 09:31 PM2023-08-08T21:31:04+5:302023-08-08T21:32:32+5:30
मिळालेल्या माहितीनुसार, आतिफ हे दिल्ली-तिरुपती एक्स्प्रेस ट्रेनच्या एसी कोचमध्ये प्रवास करत असताना त्यांची नजर त्यांच्या सीटभोवती फिरणाऱ्या झुरळांवर पडली.
नवी दिल्ली : भारतीय ट्रेनमध्ये प्रवास करणे खूप सोयीचे झाले आहे, तर काही वेळा प्रवाशांना काही गैरसोयींनाही सामोरे जावे लागते. अलीकडेच एका प्रवाशाला दिल्ली-तिरुपती एक्स्प्रेस ट्रेनमधून प्रवास करताना अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला. आतिफ अली नावाच्या या प्रवाशाने ट्विटरवर आपल्या नुकत्याच रेल्वे प्रवासादरम्यान घडलेल्या या घटनेचा उल्लेख केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये सांगितले की, त्यांच्या सीटजवळ मोठ्या प्रमाणात झुरळ (cockroaches in train) फिरत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, आतिफ हे दिल्ली-तिरुपती एक्स्प्रेस ट्रेनच्या एसी कोचमध्ये प्रवास करत असताना त्यांची नजर त्यांच्या सीटभोवती फिरणाऱ्या झुरळांवर पडली. त्यांनी ट्विटरवर झुरळांचा फोटो देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांच्या उशीवर आणि सीटवर झुरळ रेंगाळताना दिसत आहेत. ट्विटरवर शेअर केलेल्या आपल्या पोस्टमध्ये आतिफ अली यांनी लिहिले की, तो आणि त्याचे सहकारी प्रवासी झोपले असताना त्यांच्यावर झुरळ रेंगाळत होते. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये रेल्वे मंत्रालय, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि इतर अधिकाऱ्यांनाही टॅग केले.
"ट्रेन क्रमांक १२७०८ A/C डब्यात, आम्ही झोपलो असताना आमच्या अंगावर झुरळं फिरत होती, ज्या स्वच्छतेचे आश्वासन दिले होते ते कुठे आहे?", असा सवाल आतिफ अली यांनी ट्विटद्वारे केला आहे. दरम्यान, आतिफ अली यांच्या या तक्रारीवर रेल सेवानेही उत्तर दिले आणि त्यांना प्रवासाचा तपशील विचारला आणि मोबाईल क्रमांक डीएम करण्यास सांगितले. यासोबतच त्यांना रेल मदादच्या वेबसाइटला भेट देण्यास किंवा 139 वर कॉल करण्यास सांगितले आहे, जेणेकरून समस्या त्वरित सोडवता येईल. मात्र, त्यानंतर आतिफ यांनीआणखी एका ट्विटमध्ये लिहिले की, "तुमच्या उत्तराबद्दल धन्यवाद, मला आशा आहे की हा प्रश्न सुटला असता, कारण ट्विट केल्यानंतर अर्ध्या तासाने मी माझ्या स्टेशनवर उतरलो होतो".
Train number 12708 A/C compartment, had cockroaches roaming on our bodies while we were asleep
— Aatif Ali (@AatifAli2003) August 7, 2023
WHERE IS THE PROMISED HYGIENE? @PMOIndia@RailMinIndia@Central_Railway@AshwiniVaishnaw@RailwaySeva@drmsecunderabad@drmhybpic.twitter.com/bzWwD5xxFR
ट्रेनमध्ये स्वच्छतेची समस्या उद्भवण्याची ही पहिलीच घटना नसली तरी याआधीही अनेक प्रवाशांनी ट्रेनमधील स्वच्छतेबाबत तक्रारी केल्या आहेत. काही दिवसांपूर्वी सुबोध पहलाजन नावाच्या प्रवाशाला वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणात झुरळ आढळले होते. सुबोध पहलजनने जेवणाचे फोटोही शेअर केले होते, ज्यामध्ये ब्रेडच्या तुकड्याला झुरळ अडकलेले दिसत होते. त्यांनी ट्विटरवर IRCTC अधिकाऱ्याला टॅग करून आपली चिंता व्यक्त केली. दरम्यान, तक्रारकर्त्याला तत्परतेने उत्तर देत रेल सेवाने दुर्दैवी घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि भविष्यात घटना टाळण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन प्रवाशांना दिले.