आर्मी हॉस्पिटलमधील रक्ताने युवक HIV संक्रमित, सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2022 04:37 PM2022-10-20T16:37:43+5:302022-10-20T16:43:08+5:30

धक्कादायक प्रकारानंतर युवकाने सुप्रीम कोर्टाकडे मागितली होती दाद

man contracted HIV after blood transfusion in army hospital Supreme Court orders to give free medical treatment  | आर्मी हॉस्पिटलमधील रक्ताने युवक HIV संक्रमित, सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

आर्मी हॉस्पिटलमधील रक्ताने युवक HIV संक्रमित, सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्णय

Next

Man contracted HIV after blood transfusion: एका व्यक्तीला आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्त देण्यात आले होते. त्या रक्ताच्या माध्यमातून त्या व्यक्तिला HIV चे संक्रमण झाल्याची धक्कादायक घटना घडली. या संदर्भात संक्रमित व्यक्तीने, सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. त्यावर आज सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला. आर्मी हॉस्पिटलमध्ये रक्त संक्रमणानंतर HIV बाधित झालेल्या व्यक्तीला मोफत उपचार देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आर्मी हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाला दिले. HIVची लागण झाल्यानंतर त्या व्यक्तीने रुग्णालयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या व्यक्तीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण आदेश दिला.

याचिकाकर्त्याने बुधवारी या प्रकरणाची तातडीने सुनावणी घेण्याची विनंती न्यायालयाला केली होती. यानंतर न्यायालयाने हे प्रकरण गुरुवारी सुनावणीसाठी घेतले. याचिकाकर्त्याला कोणाचे रक्त देण्यात आले होते, असे न्यायालयाने व्यवस्थापनाला विचारले होते. त्यावेळी, असा कोणताही जुना रेकॉर्ड नसल्याचे रुग्णालयाने सांगितले. रुग्णालयाच्या वतीने वकिलांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून याचिकाकर्त्याच्या उपचारात सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यानुसार, या व्यक्तीला बरे करण्यासाठी काही उपचार करता येत असतील तर ते तातडीने करावेत, असा आदेश न्यायालयाने दिला.

विशेष म्हणजे, गेल्या १० वर्षात आंध्र प्रदेशात HIVची सर्वाधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. येथे ३.१८ लाख लोकांना संसर्ग झाला आहे. महाराष्ट्र या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्रात २.८४ लाख संक्रमित झाले आहेत. तर कर्नाटक (२.१२ लाख), तामिळनाडू (१.१६ लाख), उत्तर प्रदेश (१.१० लाख) आणि गुजरात (८७ हजार ४४०) मध्येही प्रकरणे नोंदवली गेली आहेत. तसे असले तरी सुदैवाने वर्षानुवर्षे HIV बाधित रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट पाहायला मिळत आहे.

दरम्यान, HIV शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो आणि त्यावर वेळीच उपचार न केल्यास एड्स होतो. असुरक्षित लैंगिक संबंधांव्यतिरिक्त, हा विषाणू संक्रमित व्यक्तीच्या रक्त संक्रमणाद्वारेही पसरतो. एचआयव्हीचा संसर्ग झाल्यानंतर काही आठवड्यांच्या आत- ताप, घसा खवखवणे आणि अशक्तपणा- अशी फ्ल्यू सारखी लक्षणे दिसतात. त्यानंतर या आजारात एड्स होईपर्यंत कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. एड्समध्ये वजन कमी होणे, ताप येणे किंवा रात्री घाम येणे, अशक्तपणा यासारखी लक्षणे दिसून येतात.

Web Title: man contracted HIV after blood transfusion in army hospital Supreme Court orders to give free medical treatment 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.