डोक्यावर विग आणि कानात इअरफोन, पोलिस भरती परीक्षेत कॉपी करणारा अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 12:20 PM2021-12-21T12:20:26+5:302021-12-21T13:08:57+5:30
या कॉपी करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी पकडले असून, त्याचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.
कानपूर: सरकारी नोकऱ्यांच्या परीक्षांमध्ये कॉपी आणि पेपर फुटणे हे प्रकार मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. महाराष्ट्रासह अनेक राज्यात सध्या विविध खात्यातील भरतीच्या परीक्षा होत आहेत, यात असे प्रकार घडल्याच्या बातम्या दररोज माध्यमांमध्ये येत आहेत. अशाच प्रकारची घटना आता उत्तर प्रदेशातून समोर आली आहे.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने परीक्षेत कॉपी करण्यासाठी असे काम केले, ज्याचा कुणी विचारही केला नसेल. इतक्या चपळाईने कॉपी करण्याचा प्रयत्न केल्यानंतरही तो पकडला गेला. व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ IPS अधिकारी रुपिन शर्मा यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केला आहे.
काय आहे व्हिडिओत?
रुपिन शर्मा यांनी व्हिडिओसोबत कॅप्शनमध्ये लिहिले की, 'उत्तर प्रदेशमध्ये पोलीस उपनिरिक्षकाच्या परीक्षेत कॉपी करण्याची चांगली पद्धत.' व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, पोलिसांनी कॉपी करणाऱ्या व्यक्तीला पकडले आहे. पोलीस त्याच्या डोक्यावरील केसांचा विग काढत आहेत. या विगमध्ये त्याने कॉपी करण्याची वस्तू लपवली आहे. पोलिसांनी मेटल डिटेक्टरच्या मदतीने या कॉपी बहाद्दराला पकडले. त्या व्यक्तीने आपल्या दोन्ही कानातही खूप लहान आकाराचे इअरफोन्स लावले होत.
पहा VIDEO:
#UttarPradesh mein Sub-Inspector
— Rupin Sharma IPS (@rupin1992) December 21, 2021
की EXAM mein #CHEATING#nakal के शानदार जुगाड़ ☺️☺️😊😊😊@ipsvijrk@ipskabra@arunbothra@renukamishra67@Uppolice well done pic.twitter.com/t8BbW8gBry
तुम्ही पाहू शकता की, लोक कॉपी करण्यासाठी किती प्रयत्न करतात. पण, कॉपी करणारा कधीच यशस्वी होऊ शकत नाही, कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तो पकडला जातो. कॉपी करणे चुकीचे आहे आणि चुकीची गोष्ट लपवता येत नाही. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोक व्हिडिओवर विविध कमेंटही करत आहेत.