धक्कादायक! एक इंच माशाचा काटा गिळल्याने शेतकऱ्याचा मृत्यू, नेमक काय घडलं वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2022 12:33 PM2022-09-22T12:33:19+5:302022-09-22T12:44:18+5:30
मासा खाणे प्रत्येकाला आवडते. मासा आरोग्यालाही उपयुक्त असतो. पण मासा खाणे कधी कधी जीवावर सुद्धा बेतू शकते. श्रीलंकेतून अशीच एक घटना समोर आली आहे.
कोलंबो : मासा खाणे प्रत्येकाला आवडते. मासा आरोग्यालाही उपयुक्त असतो. पण मासा खाणे कधी कधी जीवावर सुद्धा बेतू शकते. श्रीलंकेतून अशीच एक घटना समोर आली आहे. एका शेतकऱ्याने चुकून माशाचे एक इंच हाड गिळले. यात या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
ही घटना श्रीलंकेतील आहे. या व्यक्तीचे वय ६० होते. माशाचे हाड खाताच त्यांना उल्टी सुरू झाल्या आणि अस्वस्थस्त वाटू लागले. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांची परिस्थीती पाहून डॉक्टरांनी त्यांना आयसीयुमध्ये ठेवले.
तीन दिवसानंतर ठाणे पालिका हद्दीत ९ 'स्वाइन फ्लु'च्या रुग्णांची नोंद
डॉक्टरांनी अनेक तपासण्या केल्यानंतर रुग्णाची किडणी काम करत नसल्याचे समोर आले. सेप्सिसमध्ये,शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अवयवांवरच हल्ला करते.यानंतर डॉक्टरांनी दोन तास ऑपरेशन केले. यात रुग्णाच्या आतड्यांमधझ्ये छोटे छिद्र असल्याचे समोर आले. त्या व्यक्तीने १ इंच माशाचे हाड गिळल्यामुळे हा प्रकार घडल्याचे समोर आले.
रुग्णाला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी शर्थाीचे प्रयत्न केले, पण रुग्णाला यातच हृदयविकाराचा झटका आला यात त्या रुग्णाचा मृत्यू झाला. माशाच्या मोठे हाड गिळल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडत असतात. अशा घटना समुद्र किनाऱ्यावरील लोकांमध्ये जास्त घडत असतात. अशा पद्धतीच्या घटनांमध्ये जर रुग्णाला वेळेत दाखल केले तर त्याच्यावर लगेच निदान होऊ शकते.