धक्कादायक! बॅडमिंटन खेळताना अचानक 'तो' खाली कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू; मित्र म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 10:25 AM2023-03-01T10:25:28+5:302023-03-01T10:45:47+5:30

श्याम ऑफिसमधून परतल्यानंतर दररोज बॅडमिंटन खेळायला जायचे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

man died by heart attack while playing badminton in- prof jayshankar indoor stadium hyderabad | धक्कादायक! बॅडमिंटन खेळताना अचानक 'तो' खाली कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू; मित्र म्हणतात...

धक्कादायक! बॅडमिंटन खेळताना अचानक 'तो' खाली कोसळला, हार्ट अटॅकने मृत्यू; मित्र म्हणतात...

googlenewsNext

हैदराबादच्या सिकंदराबाद येथील लालपेटमध्ये बॅडमिंटन खेळताना एका व्यक्तीचा अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. यामध्ये 38 वर्षीय श्याम यादव बॅडमिंटन कोर्टवर पडलेले दिसत आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, श्याम ऑफिसमधून परतल्यानंतर दररोज बॅडमिंटन खेळायला जायचे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, बॅडमिंटन खेळत असताना श्याम यांना मंगळवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला आणि ते बेशुद्ध झाले. यानंतर त्यांच्या काही त्यांना उपचारासाछी जवळच्या रुग्णालयात नेले. येथे डॉक्टरांनी श्याम यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्याच वेळी, ज्या लोकांसोबत तो खेळायचा त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. श्याम एकदम फिट होते. आम्ही रोज बॅडमिंटन खेळायचो असं त्यांच्या मित्रांनी म्हटलं आहे. 

सावधान! अचानक छातीत दुखतं अन्...; जिममध्ये हार्ट अटॅकने मृत्यू होण्यामागे 'हे' आहे 'कारण'

हार्ट अटॅक येणाच्या अनेक घटना याआधी देखील घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील अहमदाबादमध्ये क्रिकेट सामन्यादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. जीएसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बॉलिंग करताना जीएसटी कर्मचाऱ्याची प्रकृती खालावली आणि तो जमिनीवर कोसळला. गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये हृदयविकाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. राजकोट- सुरतमध्ये क्रिकेट खेळत असताना हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. 

'ती' मॅच ठरली शेवटची! क्रिकेट खेळताना GST कर्मचाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू; झालं असं काही...

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदाबादमध्ये जीएसटी कर्मचारी आणि सुरेंद्रनगर जिल्हा पंचायत यांच्यात सामना सुरू होता. या सामन्यात जीएसटी कर्मचारी वसंत राठोड यांनीही सहभाग घेतला होता. बॉलिंग करताना वसंत यांच्या छातीत दुखू लागले आणि ते जमिनीवर पडले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, राठोड यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. चार दिवसांपूर्वी अशाप्रकारे क्रिकेट खेळताना दोघांचा मृत्यू झाला होता. क्रिकेटच्या मैदानात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूची ही तिसरी घटना आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: man died by heart attack while playing badminton in- prof jayshankar indoor stadium hyderabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.