दुर्दैवी! बेडसाठी विनवण्या करत राहीला मुलगा; अखेर ऑक्सिजनअभावी बाबांनी स्ट्रेचरवरच सोडले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 02:15 PM2021-05-12T14:15:21+5:302021-05-12T14:40:31+5:30
Man dies on stretcher : आपल्या वडीलांना बेड मिळावा यासाठी मुलानं खूप प्रयत्न केले, पण काळापुढे कोणाचेही चालले नाही. अखेर ऑक्सिनजन अभावी रुग्णालयाच्या बाहेरच या मुलाच्या वडीलांना आपले प्राण गमवावे लागले.
(Image Credit - Amar uajala)
कोरोनाकाळात आपल्या कुटुंबातील लोकांचे, नातेवाईकांचे प्राण वाचवण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत आहे. अनेकदा प्रयत्न करूनही रुग्णाचा जीव वाचवता येत नाही. वाढत्या रुग्णसंख्येत आता ऑक्सिजनची कमतरता, बेड्स उपलब्ध नसणं, औषधांची टंचाई यांमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागत आहेत. अशीच एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. आपल्या वडीलांना बेड मिळावा यासाठी मुलानं खूप प्रयत्न केले, पण काळापुढे कोणाचेही चालले नाही. अखेर ऑक्सिनजन अभावी रुग्णालयाच्या बाहेरच या मुलाच्या वडीलांना आपले प्राण गमवावे लागले.
मेरठमधील 75 वर्षांच्या आजोबांना श्वास घ्यायला त्रास होत होता. ते जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होते. वडीलांना स्ट्रेचरवर त्रास होत असल्याचे पाहून शेतकरी मुलगा भंवरसिंग ओरडतच राहिला. 'त्यांना कोरोना नाही, भरती करा आणि उपचार सुरू करा.' असं वारंवार ओरडून सांगितलं पण भंवरसिंग यांचे कुणी ऐकले नाही.
रुग्णालयातील कर्मचारी असे म्हणत राहिले की प्रथम कोरोना चाचणी घ्या, तरच तुम्हाला प्रवेश मिळेल. बराच काळ या आजोबांना कोणीही भरती करून घेतलं नाही. तेव्हा आजोबांनी प्राण सोडले. 'आपण आपल्या रूग्णालयाचं बघा, आम्ही आमचा माणूस गमवला आहे.' असे म्हणत असह्य्य कुटुंब मृतदेहासह निघून गेलं.
माणुसकीला काळीमा फासणाही ही घटना सोमवारी सकाळी घडली. भंवरसिंग यांचे वडील भोपाळसिंग ठाकूर (वय 75) यांना अनेक दिवसांपासून फुफ्फुसांचा त्रास होता.
हृदयद्रावक! घरी पडून होता पत्नीचा मृतदेह, सायकलने १३ तासात १३० किमी प्रवास करून पोहोचला पती...
भंवर म्हणाले की , ''कोरोना लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर त्यांना ताप आला होता, त्यानंतर तब्येत काहीशी खराब झाली होती. रविवारी भोपाळसिंग यांना खाजगी रुग्णालयात दाखविण्यात आले, सीटी स्कॅनने त्यांच्या फुफ्फुसात सूज दिसून आले. त्यांची ऑक्सिजन पातळी 70 वर होती. रविवारी खतौली आरोग्य केंद्रावर त्यांना कोरोना तपासणी करायला लावली. त्यानंतर सकाळी बाबांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी आम्ही जिल्हा रूग्णालयात आलो.''
सलाम! स्वत:ला गंभीर आजार असताना दुसऱ्यांपर्यंत ऑक्सीजन पोहोचवणारा 'देवदूत'
या अगोदर त्यांनी अडीचशे रुपयांच्या ऑक्सिजनसह छोटे सिलिंडरही घेतले. त्याने काही काळ ऑक्सिजन दिला, परंतु नंतर प्रकृती बिघडू लागली. रुग्णवाहिका जिल्हा रूग्णालयात दाखल झाली आणि कर्मचार्यांना माहिती दिली. रुग्णालय कर्मचार्यांनी विचारले की, आपला कोरोना अहवाल दाखवा. यावर भंवरसिंह म्हणाले की, आम्ही कालच चाचणी केली आहे. रिपोर्ट आला की दाखवू पण तुम्ही आता त्यांना भरती करून घ्या. पण त्यांनी काहीही ऐकले नाही. अखेर ऑक्सिजन अभावी आजोबांना आपला जीव गमवावा लागला.