हा कसला बाप?... मित्राला 'गिफ्ट' दिली स्वतःची मुलगी, केला सामूहिक बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 04:20 PM2018-04-19T16:20:39+5:302018-04-19T19:14:53+5:30
बलात्कारानंतर सदर मुलीला 18 तास कोंडून ठेवण्यात आले. सोमवारी तिला बाहेर सोडण्यात आले.
सीतापूर - जम्मू कश्मीरमधील कथुआत आठ वर्षांच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणामुळे देशात संतापाची लाट उसळली असतानाच उत्तरप्रदेशमधील एका व्यक्तीने आपल्या मुलीला मित्रांना गिप्ट केलं आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
लखनऊ पासून 70 किमी दूर असलेल्या सीतापूरमध्ये ही मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, 15 एप्रिल रोजी कमलापूर येथील जत्रेतून घरी आल्यानंतर मुलीच्या वडिलाने त्याचा मित्र, हिस्ट्रीशीटर मान सिंहला घरी बोलावले. त्यानंतर त्याच्या 35 वर्षीय मुलीला मान सिंहबरोबर बाइकवरून जायला सांगितले. मान सिंह तिला घेऊन मेराज नावाच्या मित्राच्या घरी गेला. त्यानंतर या दोघांसह मुलीच्या वडिलानेही तिच्यावर बलात्कार केला.
बलात्कारानंतर सदर मुलीला मेराजच्या घरी 18 तास कोंडून ठेवण्यात आले. सोमवारी तिला बाहेर सोडण्यात आले. त्यामुळे घरी आल्यावर या मुलीने तिच्या आईला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने तिने पोलिसात गुन्हा दाखल केला, असं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. दोन जण फरार असून यामध्ये पीडितेच्या वडिलांचा समावेश आहे.
पीडित महिलेचा विवाह 16 वर्षापूर्वीच झाला होता. लग्नाला दोन वर्ष झाल्यावर पतीशी भांडण झालं म्हणून ती माहेरी निघून आली होती. नोव्हेंबर 2017 मध्येही या मुलीने तिच्या वडिलांवर बलात्काराचा आरोप केला होता. त्यानंतर तिच्या वडिलाला गावातून हाकलून देण्यात आले होते. पोलिसांनी त्याला अटक केली होती. फेब्रुवारीमध्ये पिडीत महिलेचा पिता जमानतवर बाहेर आला आहे. 2017 मध्ये झालेल्या घटनेनंतर पिडीत महिला आपल्या 14 वर्षाच्या मुलाबरोबर वेगळी राहत आहे.
बलात्कारांत वाढ -
भारतात पंधरा मिनिटाला एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार होतो. नॅशनल क्राइम रेकॉर्ड्स ब्युरोच्या आकडेवारीनुसार बालकांवरील अत्याचारांच्या प्रकरणात २०१५ पेक्षा २०१६मध्ये ८२ टक्के वाढ झाली. अत्याचार होण्याचे सर्वाधिक प्रमाण उत्तर प्रदेशात आहे. देशातील एकूण गुन्ह्यांपैकी १५ टक्के गुन्हे उत्तर प्रदेशमध्ये घडतात. गुजरातमधील सुरतमध्येही ११ दिवसांपूर्वी एका बालिकेचा मृतदेह मिळाला होता. तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता. अद्याप तिची ओळख पटलेली नाही.