Mann Ki Baat : "कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे हे ह्रदयाला स्पर्शून गेलं"
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 12:36 PM2021-03-28T12:36:41+5:302021-03-28T12:41:59+5:30
Narendra Modi And Mann Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी "मन की बात" (Mann Ki Baat) मधून संवाद साधला. नरेंद्र मोदींनी कोरोना लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूच्या काही आठवणींना उजाळा दिला.
नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून एकूण रुग्णांची संख्या ही एक कोटीवर पोहोचली आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज देशवासियांशी "मन की बात" (Mann Ki Baat) मधून संवाद साधला. नरेंद्र मोदींनी कोरोना लॉकडाऊन आणि जनता कर्फ्यूच्या काही आठवणींना उजाळा दिला. "गेल्या वर्षी मार्च महिन्यातच देशाने पहिल्यांदा जनता कर्फ्यू शब्द ऐकला. महान देशातील जनतेच्या शक्तीची अनुभूती म्हणजे जनता कर्फ्यू संपूर्ण जगासाठी आदर्श उदाहरण ठरला" असं मोदींनी म्हटलं आहे.
"शिस्तीचं हे अभूतपूर्व असं उदाहरण होतं. येणाऱ्या पिढ्यांना गोष्टींचा गर्व वाटेल. तसेच कोरोना योद्ध्यांच्या सन्मानार्थ आपण वाजवलेल्या टाळ्या, थाळ्या आणि लावलेले दिवे हे सर्व कोरोना योद्ध्यांच्या ह्रदयाला स्पर्श करून गेलं. त्यामुळेच कोरोना योद्धे संपूर्ण वर्षभर न थकता, न थांबता सेवा करत राहिले. देशाच्या प्रत्येक नागरिकाचा प्राण वाचवण्यासाठी लढत राहिले. गेल्या वर्षी कोरोना लस कधी येणार? हा सर्वांना प्रश्न पडला होता. पण आता आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे भारत जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवत आहे" असं देखील मोदींनी म्हटलं आहे.
It was in March last year when we heard the term 'Janata Curfew'. It became an inspiration for the entire world as it was an extraordinary example of discipline: PM Modi during the 75th episode for Mann Ki Baat
— ANI (@ANI) March 28, 2021
पंतप्रधान मोदी यांनी देशातील मुलींचं भरभरून कौतुक केलं आहे. आमच्या मुली आज प्रत्येक ठिकाणी आपली ओळख निर्माण करत आहेत. खेळाप्रती त्यांच्यामध्ये आवड निर्माण होत आहे. क्रीडा प्रकारात ठसा उमटवणाऱ्या महिला खेळाडूंचं पंतप्रधानांनी अभिनंदन केलं आहे. "योगायोग म्हणजे मार्च महिन्यात जेव्हा आपण महिला दिन साजरा करत होतो, तेव्हा अनेक महिला खेळाडूंनी पदकं आणि विक्रमांची आपल्या नावावर नोंद केली. दिल्लीत झालेल्या नेमबाजी स्पर्धेत भारत पहिल्या क्रमाकांवर राहिला. सुवर्ण पदकांमध्येही भारताने बाजी मारली" असं म्हणत कौतुक केलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
In the month of March when we are celebrating Women's Day, many women players secured records and medals in their name. India bagged top position during the ISSF World Cup shooting organised at Delhi. India also topped the gold medals tally: PM Modi during #MannKiBaatpic.twitter.com/jE5C41LDT7
— ANI (@ANI) March 28, 2021
Recently Mithali Raj has become the first Indian woman cricketer to have made ten thousand runs. Many congratulations on her achievement: PM Modi during #MannKiBaatpic.twitter.com/hCNjrwWGWx
— ANI (@ANI) March 28, 2021
Programmes in connection with Amrit Mahotsav are being held throughout the country. Be it struggle saga of a freedom fighter; be it history of a place or any cultural story from country, you can bring it to fore during Amrit Mahotsav& become a means to connect with countrymen: PM pic.twitter.com/uAteftAOs0
— ANI (@ANI) March 28, 2021
During the 75 episodes, we discussed innumerable topics including rivers to himalayan peaks, deserts to natural disasters, tales of service to mankind, technological inventions to stories of innovations from remote areas: PM Narendra Modi during the 75th episode for Mann Ki Baat pic.twitter.com/Y2OCIrByUC
— ANI (@ANI) March 28, 2021