Man ki Baat : मोदींनी देशाला दिला नवा इव्हेंट, 'नदी दिवस' साजरा करण्याचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 12:08 PM2021-09-26T12:08:40+5:302021-09-26T12:58:01+5:30
Man ki Baat : सध्याची तरुणाई दररोज कुठला ना कुठला दिवस साजरा करते. वाढदिवसापासून ते टी डे, मनी डे, हनी डे, असे एकापेक्षा एक डे आपण साजरे करतो. गुगलवर सर्च केल्यानंतर वर्षभरातील 365 दिवसांच्या 'डे'चं कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळेल.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला रवाना झाल्याचा विमानातील फोटो चांगलाचा व्हायरल झाला होता. विमानप्रवासातही काम करणाऱ्या मोदींचे सर्वत्र कौतुक होत होतं. तर, अमेरिका दौऱ्यावर जाण्यापूर्वीच मोदींनी आजच्या रविवारचा 81वा 'मन की बात' कार्यक्रम रेकॉर्ड केला होता. त्या माध्यमातून त्यांनी देशवासीयांना संबोधित केले. आजच्या मन की बातमधून मोदींनी देशाला आणखी एक इव्हेंट दिला आहे. आज विश्व नदी दिवस असल्याचे सांगत मोदींनी हा दिन साजरा करण्याचे सूचवले आहे.
सध्याची तरुणाई दररोज कुठला ना कुठला दिवस साजरा करते. वाढदिवसापासून ते टी डे, मनी डे, हनी डे, असे एकापेक्षा एक डे आपण साजरे करतो. गुगलवर सर्च केल्यानंतर वर्षभरातील 365 दिवसांच्या 'डे'चं कॅलेंडर तुम्हाला पाहायला मिळेल. मात्र, आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. देशाची सांस्कृतिकता आणि परंपरेचा हा दिवस आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून देशाला जोडणारा आजचा दिवस आहे. आज विश्व नदी दिवस आहे, अशी आठवण मोदींनी आपल्या आजच्या मन की बात कार्यक्रमातून करुन दिली.
Speaking on a wide range of topics in #MannKiBaat. Tune in. https://t.co/FNJDiv7Tvc
— Narendra Modi (@narendramodi) September 26, 2021
आपण सर्वांनी दरवर्षी एक दिवस नदी दिवस साजरा केलाच पाहिजे, कारण लहान-सहान घटनांमधून मोठी क्रांती होते. महात्मा गांधींनीही लहान-लहान प्रयोगातून मोठं काम केल्याचंही मोदींनी म्हटलं. नदी आपल्यासाठी भौतिक वस्तू नसून जिवंत साधनसंपत्ती आहे. म्हणूनच आपण नदीला आपली माता मानतो, आपले कितीही उत्सव, सण, पंरपरा आणि उमंग हे सर्व या मांतांच्या कुशीतच साजरे होतात. गुजरातमध्ये पहिला पाऊस झाल्यानंतर जल-जलिनी एकादशी साजरी करण्यात येते. तसेच, बिहार आणि पूर्वेकडील भागात छठपूजा आयोजित केली जाते. त्यासाठी, किनाऱ्यांची स्वच्छता करण्यात आली असेल, असे म्हणत प्रदुषणमुक्त नद्यांवरही मोदींनी मन की बात केली.