निर्घृण ! वारंवार भुंकत होते म्हणून रागाच्या भरात कुत्र्याच्या 9 पिल्लांना संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2018 05:23 PM2018-02-01T17:23:11+5:302018-02-01T17:28:11+5:30

श्वानांच्या भुंकण्यावरुन रागाच्या भरात तामिळनाडूतील एका व्यक्तीनं एक नाही, दोन नाही तर तब्बल 9 पिल्लांना ठार मारलं आहे.

man killed 9 puppies as they yelping at him in chennai | निर्घृण ! वारंवार भुंकत होते म्हणून रागाच्या भरात कुत्र्याच्या 9 पिल्लांना संपवलं

निर्घृण ! वारंवार भुंकत होते म्हणून रागाच्या भरात कुत्र्याच्या 9 पिल्लांना संपवलं

Next

चेन्नई -  श्वानांच्या भुंकण्यावरुन रागाच्या भरात तामिळनाडूतील एका व्यक्तीनं एक नाही, दोन नाही तर तब्बल 9 पिल्लांना ठार मारलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  भटक्या श्वानांच्या वारंवार भुंकण्यावरुन संतापलेल्या मीनामबकम येथील अनकपुथुर येथील गुना नावाच्या एका व्यक्तीनं 9 लहान श्वानांना निर्घृण पद्धतीनं ठार केले आहे. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी तो दारूच्या नशेत असल्याची माहिती समोर आली. गुना हा मजुरीचं काम करतो. याप्रकरणी गुनाविरोधात शेजारी राहणारे एम. कार्तिक यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास गुनाला आपल्या घराजवळ लहान श्वानांना ठार मारताना पाहिल्याचं कार्तिकनं आपल्या तक्रारीत म्हटले आहे. ठार मारण्यात आलेले श्वान केवळ एक महिन्यांचेच असल्याचंही कार्तिकनं सांगितले. 

पोलीस अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्तिक रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आपल्या घराकडे परतत होता, यावेळी त्यानं श्वानानांचा आवाज ऐकला. पुढे जाऊन पाहिलं तर गुना त्या श्वानांना निर्घृण पद्धतीनं ठार करत असल्याचं त्यानं पाहिलं.  कार्तिकनं तातडीनं पोलिसांनी संपर्क साधत घडल्या प्रकाराची माहिती दिली. गुनानं ठार केलेल्या श्वानांना रोज दूध पाजत असल्यानं कार्तिक भावूक झाला होता. 

पोलीस अधिका-यांनी असेही सांगितले की, शेजा-यांच्या माहितीनुसार गुनाचं त्याच दिवशी आईसोबत वाद झाला होता. यानंतर दारू पिऊन तो झोपण्यासाठी गेला, मात्र श्वानांच्या भूंकण्यावरुन त्याला जाग आली व रागाच्या भरात त्यानं काठीनं श्वानांना मारहाण केली व त्यांना ठार केलं. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गुनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: man killed 9 puppies as they yelping at him in chennai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :dogकुत्रा