आयुष्यभराची कमाई ५ लाखांची रक्कम वाळवीने केली मातीमोल, आंध्रातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 03:26 AM2021-02-18T03:26:22+5:302021-02-18T06:36:30+5:30

Man Loses Life Savings As Termites Eat Cash Worth Rs 5 Lakh Stored in Iron Trunk : हा प्रकार आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील मायलावरम या गावी घडला. ५०० व २०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ही रोख रक्कम सदर व्यापाऱ्याने ठेवली होती.

Man Loses Life Savings As Termites Eat Cash Worth Rs 5 Lakh Stored in Iron Trunk | आयुष्यभराची कमाई ५ लाखांची रक्कम वाळवीने केली मातीमोल, आंध्रातील घटना

आयुष्यभराची कमाई ५ लाखांची रक्कम वाळवीने केली मातीमोल, आंध्रातील घटना

googlenewsNext

अमरावती : आंध्र प्रदेशमधील एका व्यापाऱ्याने आपली आयुष्यभराची कमाई असलेली पाच लाख रुपयांची रोख रक्कम अनेक महिन्यांपूर्वी बँकेऐवजी घरात एका पेटीमध्ये सांभाळून ठेवली होती. मात्र पेटीतील नोटा वाळवीने खाल्ल्याने आता मातीमोल ठरल्या आहेत. 
हा प्रकार आंध्र प्रदेशमधील कृष्णा जिल्ह्यातील मायलावरम या गावी घडला. ५०० व २०० रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात ही रोख रक्कम सदर व्यापाऱ्याने ठेवली होती. बिजली जमालय्या असे त्याचे नाव असून, तो डुकरांचा व्यापार करतो. त्यातून होणारी कमाई तो बँकेत ठेवण्याऐवजी घरातील एका पेटीत ठेवत असे. त्यातून जमा झालेल्या पाच लाख रुपयांतून या व्यापाऱ्याला नवे घर बांधायचे होते. 
नोटांना वाळवी लागून त्या मातीमोल ठरल्याचे पाहताच बिजली जमायल्ला या व्यापाऱ्याला प्रचंड दु:ख झाले. त्याने या खराब नोटा गावात रस्त्यावर खेळणाऱ्या लहान मुलांना वाटून टाकल्या. लहान मुलांच्या हातात इतकी मोठी रक्कम बघून गावातील मंडळींनी पोलिसांना ही माहिती कळविली. वाळवीने खाल्लेल्या या नोटा बिजली जमायल्ला या व्यापाऱ्याने मुलांना दिल्या असे  चौकशीतून निष्पन्न होताच सारा प्रकार उजेडात आला. (वृत्तसंस्था)

Web Title: Man Loses Life Savings As Termites Eat Cash Worth Rs 5 Lakh Stored in Iron Trunk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.