CoronaVirus News: धक्कादायक! दोघांनी कोरोना रुग्णाचा मृतदेह नदीत फेकला; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2021 01:54 PM2021-05-30T13:54:01+5:302021-05-30T13:54:21+5:30

CoronaVirus News: कोरोना रुग्णाचा मृतदेह नदीत फेकण्यात आल्यानं एकच खळबळ; गुन्हा दाखल

Man in PPE kit throws body into river in UPs Balrampur incident caught on camera | CoronaVirus News: धक्कादायक! दोघांनी कोरोना रुग्णाचा मृतदेह नदीत फेकला; व्हिडीओ व्हायरल

CoronaVirus News: धक्कादायक! दोघांनी कोरोना रुग्णाचा मृतदेह नदीत फेकला; व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

बलरामपूर: उत्तर प्रदेशच्या बलरामपूरमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये दोन तरुण एक मृतदेह पुलावरून नदीपात्रात फेकताना दिसत आहेत. मृतदेह फेकणाऱ्या दोघांपैकी एकानं पीपीई किट घातला आहे. सिसई घाटावर असलेल्या पुलावर हा धक्कादायक प्रकार घडला असून इथून जाणाऱ्या एका वाहन चालकानं तो मोबाईलमध्ये चित्रित केला आहे.

व्हायरल झालेला व्हिडीओ २९ मेच्या संध्याकाळचा आहे. व्हिडीओत पीपीई किटशिवाय दिसणाऱ्या तरुणाची ओळख पटली आहे. त्याचं नाव चंद्र प्रकाश आहे. तो स्मशानघाटावर काम करतो. काही लोकांनी मला पुलावर बोलावलं होतं आणि मृतदेह खाली फेकला होता, असं प्रकाशनं सांगितलं. 'काही लोक आले आणि त्यांनी मला पुलावर नेलं. मी पुलाच्या दुसऱ्या टोकाला उभा होतो. तेव्हा एका तरुणानं बॅगेची चैन उघडून दगड टाकला आणि मला बोलावलं. त्यानंतर नदीत मृतदेह टाकून परत गेला. इथे लाकडं असल्याचं मी त्याला सांगितलं. पण मृतदेह जलप्रवाहित करायचं असल्याचं उत्तर त्यानं दिलं. त्याच्यासोबत अनेक जण होते. त्यांनी माझं ऐकलं नाही,' असं प्रकाशनं सांगितलं.



व्हायरल व्हिडीओबद्दल मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. विजय बहादूर सिंह यांना विचारलं असता, नदीपात्रात टाकण्यात आलेला मृतदेह सिद्दार्थनगर जिल्ह्यातल्या शोहरतगढ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेमनाथ मिश्र नावाच्या व्यक्तीचा असल्याचं त्यांनी सांगितलं. '२५ मे रोजी कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रेमनाथ यांना संयुक्त जिल्हा रुग्णालयातील एलटू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं. २८ मे रोजी त्यांचा मृत्यू झाला. कोविड प्रोटोकॉलचं पालन करून त्यांचा मृतदेह कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला,' अशी माहिती त्यांनी दिली. मृतदेह नदीत फेकल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला आहे.

Web Title: Man in PPE kit throws body into river in UPs Balrampur incident caught on camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.