दारू प्यायला नकार दिल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण, छतावरुन खाली फेकले; व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 07:37 PM2024-05-28T19:37:58+5:302024-05-28T19:39:12+5:30

व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले.

Man Pushed Off From Roof and Beaten Up For Refusing To Drink Alcohol | Incident in Lucknow UP | दारू प्यायला नकार दिल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण, छतावरुन खाली फेकले; व्हिडिओ व्हायरल...

दारू प्यायला नकार दिल्यामुळे तरुणाला बेदम मारहाण, छतावरुन खाली फेकले; व्हिडिओ व्हायरल...

लखनऊ:उत्तर प्रदेशातील लखनऊमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील मडेगंज भागात दारु पिण्यास नकार दिल्यामुळे एका व्यक्तीला छतावरुन खाली फेकण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे, खाली पडून जखमी झालेल्या व्यक्तीला इतर दोघांनी लाथांनी तुडवले. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आणि तिघांना ताब्यात घेतले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रणजीत यादव असे जखमी तरुणाचे नाव असून, तो लखनऊच्या रुपपूर खडरा भागात किराणा दुकान चालवतो. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक आरोपी रणजीतला त्याच्या घराच्या छतावरुन खाली फेकतो. रणजित रस्त्यावर पडल्यानंतर तिथे अन्य दोन आरोपी त्याला लाथांनी मारहाण करतात. या घटनेत रणजित गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रणजितने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, आरोपी नेहमी मद्यपान करायचे आणि वारंवार रणजीतच्या दुकानात यायचे. शुक्रवारी(दि.24) रात्री त्याच्या हल्लेखोर जबरदस्तीने रणजीतच्या घरात घुसले आणि त्याला दारू प्यायला लावली. रणजीतने नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला छतावरुन खाली फेकले. सहाय्यक पोलिस आयुक्त नेहा त्रिपाठी यांनी एका दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र कुमार (32), हेमंत कुमार (39) आणि अमीर गौतम (32, सर्व मद्यगंजचे रहिवासी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Web Title: Man Pushed Off From Roof and Beaten Up For Refusing To Drink Alcohol | Incident in Lucknow UP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.