Video - विदेशी महिलेची भारतात हरवली पर्स, नंतर आला 1 मेसेज...; 'त्या' शब्दांनी जिंकलं मन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 10:14 AM2023-02-26T10:14:07+5:302023-02-26T10:15:42+5:30

महिला ट्रेनमध्ये तिची पर्स विसरली. नंतर एक व्य़क्ती तिला मदत करण्यासाठी कसा पुढे आला हे तिने सांगितलं आहे.

man returns us women lost wallet internet calls him ambassador of indian tourism instagram viral video | Video - विदेशी महिलेची भारतात हरवली पर्स, नंतर आला 1 मेसेज...; 'त्या' शब्दांनी जिंकलं मन

Video - विदेशी महिलेची भारतात हरवली पर्स, नंतर आला 1 मेसेज...; 'त्या' शब्दांनी जिंकलं मन

googlenewsNext

जेव्हा परदेशी पर्यटक भारतात फिरून झाल्यानंतर आपल्या देशात परत जातात तेव्हा ते त्यांचे चांगले आणि वाईट अनुभव हे शेअर करत असतात. बर्‍याच लोकांसोबत मनोरंजक घटना घडतात. एका अमेरिकन महिलेने इन्स्टाग्रामवर तिचा अशाच एक अनुभव शेअर केला आहे. ही महिला ट्रेनमध्ये तिची पर्स विसरली. नंतर एक व्य़क्ती तिला मदत करण्यासाठी कसा पुढे आला हे तिने सांगितलं आहे.

इन्स्टाग्राम @stephandpete_ने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, त्या महिलेने सांगितले की जेव्हा ती भारतात ट्रेनमधून प्रवास करत होती तेव्हा ती तिची पर्स विसरली आणि स्टेशनवर उतरली. लवकरच, तिला तिच्या इन्स्टाग्रामवर चिराग नावाच्या माणसाकडून एक मेसेज मिळाला. ज्याने त्या महिलेला सांगितलं की तुमची पर्स सापडली आहे आणि ती त्याला परत करायची आहे. मेसेज मिळताच महिला गुजरातच्या भुजकडे गेली.

व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो की, महिलेने यासाठी चिरागचे आभार मानले आणि त्याला काही पैसे देखील दिले. मात्र तो ते स्वीकारण्यास नकार देतो आणि त्याऐवजी तो तिला आपल्या वस्तूचं रक्षण करण्यास सांगतो. ही पोस्ट शेअर करताना, त्या महिलेने "मी (3000 हून अधिक वेळा) शिकले आहे की दयाळूपणासाठी टीप देणं किती चुकीचं आहे" असं लिहिलं आहे. 

"भारतात हे असं होणं किती सामान्य आहे आणि शेवटी, किती लोकांना वाटतं की तीन वर्षांच्या मुलासोबत प्रवास करताना मी मुद्दाम माझी पर्स हरवली आहे. मी सांगते की हे दुर्लक्षामुळे झालं आहे" असंही म्हटलं. एका युजरने कमेंट सेक्शनमध्ये मला आनंद झाला की तुला ते परत मिळालं. चिराग सारख्या लोकांचा अभिमान आहे. आशा आहे की भारतात तुमचा वेळ चांगला गेला असेल. खूप प्रेम असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: man returns us women lost wallet internet calls him ambassador of indian tourism instagram viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत