Video - हृदयद्रावक! ...अन् रस्त्यावरच आयुष्य थांबलं; स्कूटी चालवताना 'त्याला' आला हार्ट अटॅक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 12:56 PM2023-02-17T12:56:58+5:302023-02-17T13:03:10+5:30
स्कूटी चालवताना एका व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
कोरोना महामारीनंतर देशभरात हृदयासंबंधीच्या आजारामध्ये मोठी वाढ झाली आहे. अनेकांनी जीव गमावला आहे. चालताना, नाचताना, गाताना मृत्यू होत असल्याच्या असंख्य, घटना समोर आल्या आहेत. हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. अशीच आणखी एक घटना जोधपूरमधून समोर आली आहे, जिथे स्कूटी चालवताना एका व्यावसायिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, व्यापारी सुरेश वाटवानी हे त्यांच्या दुकानापासून हाकेच्या अंतरावर त्यांच्या स्कूटीवरून जात होते. अचानक छातीत दुखू लागले आणि स्कूटीवरून खाली पडले. आजूबाजूला उभ्या असलेल्या काही लोकांनी ते पाहिल्यानंतर त्यांनी धावत जाऊन वाटवानी यांना थेट रुग्णालयात नेले. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी तपासून त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
भारत में हार्ट अटैक से मौत अचानक दे रही है दस्तक,दगाबाज दिल का लाइव वीडियो व्यापारी की हुई मौत @ABPNews@iampulkitmittal@prempratap04@srameshwaram#rajasthan#jodhpur#Doctorspic.twitter.com/7M4w5LVT5V
— करनपुरी (@abp_karan) February 16, 2023
स्कूटीवरून जात असताना मृत्यू
ही घटना ९ फेब्रुवारीची आहे, मात्र आता सुरेश वाटवानी यांच्या मृत्यूचे लाईव्ह सीसीटीव्ही व्हिडीओ फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओमध्ये सुरेश स्कूटीवरून बाहेर जाताना दिसत आहेत. अचानक स्कूटीचा वेग मंदावला आणि सुरेश यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला.
काही काळापासून असे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आले आहेत ज्यात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्युमुखी पडलेल्या बहुतेक लोकांचे वय सुमारे 40 ते 55 वर्षे होते आणि बहुतेक मृत्यू हार्ट अटॅकमुळे झाले आहेत. यामध्ये लोक नाचताना, खेळताना, रस्त्यावर चालताना किंवा बसताना हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत आणि त्यांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"