केजरीवालांना सचिवालयात धक्काबुक्की; अज्ञातानं डोळ्यात फेकली मिरचीपूड
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 03:37 PM2018-11-20T15:37:11+5:302018-11-20T17:02:05+5:30
सुदैवानं केजरीवाल यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही.
नवी दिल्ली: दिल्लीचेमुख्यमंत्रीअरविंद केजरीवाल यांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. त्यांच्या अंगावर एका व्यक्तीनं मिरचीपूडदेखील फेकली. सचिवालयात हा संपूर्ण प्रकार घडला. यामध्ये केजरीवाल यांचा चष्मा तुटला. सुदैवानं केजरीवाल यांना कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. मात्र या घटनेमुळे सचिवालयातील सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
अरविंद केजरीवाल यांना अनिल नावाच्या एका व्यक्तीनं सचिवालयाच्या पायऱ्यांजवळ थांबवलं. यानंतर त्यानं केजरीवाल यांचा चष्मा खेचला आणि त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. या झटापटीत केजरीवाल यांचा चष्मा तुटला. यानंतर पोलिसांनी अनिलला ताब्यात घेतलं. केजरीवाल दुपारच्या जेवणासाठी कार्यालयातून बाहेर पडत असताना ही घटना घडली. सुदैवानं केजरीवाल सुरक्षित आहेत. थोड्याच वेळात ते पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आम आदमी पार्टीकडून देण्यात आली आहे.
Anil Kumar (pic 1) came to meet Delhi CM Arvind Kejriwal in the Secretariat to share his grievances.He handed a note to the CM & touched his feet, and chilli powder fell down from his hand (pic 2).Probe underway whether it was an attack or powder fell unintentionally:Delhi Police pic.twitter.com/IpoM73OtCh
— ANI (@ANI) November 20, 2018
अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ल्याचा भाजपानं निषेध केला आहे. लोकशाहीतील हिंसेला थारा नसल्याचं भाजपा नेते विजेंद्र गुप्ता यांनी म्हटलं आहे. हल्लेखोराविरोधात कठोर कारवाई व्हावी, असंही गुप्ता म्हणाले. तर आपच्या आमदार अलका लांबा यांनी ही घटना म्हणजे केजरीवाल यांच्या विरोधातील कट कारस्थान असल्याचा आरोप केला आहे. सचिवालयासारख्या सुरक्षित ठिकाणी मुख्यमंत्र्यांवर हल्ला होता. ही बाब अतिशय गंभीर असल्याचं त्या म्हणाल्या.