१० कोटींची थकबाकी ७ दिवसात भरा तहसीलदारांची मनपाला नोटीस: २०१२पासून श्क्षिणकर, रोहयोकर, बिनशेतीकराची थकबाकी
By Admin | Published: March 2, 2016 12:04 AM2016-03-02T00:04:41+5:302016-03-02T00:04:44+5:30
जळगाव: मनपाकडे विविध शासकीय करापोटी २०१२-१३ पासून सुमारे १० कोटी ७० लाख ४१ हजारांची थकबाकी असून ही थकबाकी ७ दिवसांच्या आत भरण्याची नोटीस तहसीलदारांनी आयुक्तांना बजावली आहे. आयुक्तांनी याबाबत तातडीने पूर्तता करण्याचे आदेश संबंधीतांना दिले आहेत.
जळगाव: मनपाकडे विविध शासकीय करापोटी २०१२-१३ पासून सुमारे १० कोटी ७० लाख ४१ हजारांची थकबाकी असून ही थकबाकी ७ दिवसांच्या आत भरण्याची नोटीस तहसीलदारांनी आयुक्तांना बजावली आहे. आयुक्तांनी याबाबत तातडीने पूर्तता करण्याचे आदेश संबंधीतांना दिले आहेत.
मनपाकडे विविध शासकीय करापोटी मोठ्या प्रमाणावर थकबाकी आहे. २०१२-१३ पासून आजपर्यंत भरणा केलेला शिक्षणकर, रोहयोकर व बिनशेतीकर याबाबतच्या मागणी व वसुलीबाबत प्रत्यक्ष पडताळणी केली असता मनपाकडे तब्बल १० कोटी ७० लाखांची थकबाकी असल्याचे दिसून येत असल्याचे तहसीलदार गोविंद शिंदे यांनी मनपाला बजावलेल्या नोटीसमध्ये म्हटले आहे.
नाशिक विभागीय आयुक्तांनी तसेच जिल्हाधिकार्यांनी जळगाव तालुक्याची शासकीय वसुली अत्यल्प असल्याने तीव्र नाराजी व्यक्त केलेली असल्याने मनपाकडे थकीत रक्कमेचा भरणा करण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी नमुना १ची नोटीस बजावण्यात आलीहोती. तसेच १ जानेवारी २०१६ रोजी नमुना २ ची वसुली नोटीस देण्यात आली आहे. मात्र प्रलंबित वसुलीपैकी केवळ २ कोटी ५३ लाख ८६ हजार २४५ रुपये इतक्या रक्कमेचा भरणाच मनपाने तहसील कार्यालयाकडे केला आहे. ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून थकीत १० कोटी ७० लाखांच्या रक्कमेचा ७ दिवसांत भरणा करण्यात यावा, अन्यथा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील तरतुदीनुसार जप्ती कारवाई करून वसुली केली जाईल, असा इशारा दिला आहे. २०१२ ते २०१६ या कालावधीत मनपाकडे शिक्षण कराची २४ कोटी २८ लाख, रोहयो कर ३ कोटी ३० लाख, बिनशेतीकर ७६ लाख ६२ हजार, वाढीव बिनशेती सारा ५४ लाख ५९ हजार अशी एकूण २९ कोटी ९ लाखांची मागणी होती. त्यापैकी केवळ १८ कोटी ३९ लाख रुपये वसुली झाली आहे. तर १० कोटी ७० लाखांची थकबाकी आहे.
मनपाकडील थकबाकी (२०१२ ते २०१६)
वर्ष एकूण मागणी वसुल थकबाकी
२०१२-१३ ५ कोटी ३३ लाख ४ कोटी ७७ लाख ५६ लाख १९ हजार
२०१३-१४ ८ कोटी ७० लाख ४ कोटी ६२ लाख ४ कोटी ९ लाख
२०१४-१५ ८ कोटी ७० लाख ६ कोटी ४६ लाख २ कोटी २४ लाख
२०१५-१६ ६ कोटी ३६ लाख २ कोटी ५४ लाख ३ कोटी ८२ लाख