कर्मचार्‍यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष सुधाकर सोनकुसळे : बॅँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे विभागीय अधिवेशन

By admin | Published: April 25, 2016 12:27 AM2016-04-25T00:27:52+5:302016-04-25T00:27:52+5:30

नाशिक : बॅँकांमधील मागासवर्गीय कर्मचार्‍यांच्या विविध समस्या व प्रश्नांकडे व्यवस्थापनाकडून गांभीर्याने लक्ष पुरविले जात नाही. केवळ कर्मचार्‍यांनी बॅँकांच्या विविध योजनांची माहिती देत ती ग्राहकांना विक्री करायची आणि व्यवस्थापनाने कर्मचार्‍यांच्या सोयीसुविधांबाबत उदासीनता दाखवायची, अशी बिकट स्थिती सध्या ओढावली आहे; मात्र संघटना कर्मचार्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन बॅँक ऑफ महाराष्ट्र मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर सोनकुसळे यांनी केले.

Management questions are ignored by the management Sudhakar Sonkusale: Departmental session of the Bank of Maharashtra Employees Association | कर्मचार्‍यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष सुधाकर सोनकुसळे : बॅँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे विभागीय अधिवेशन

कर्मचार्‍यांच्या प्रश्नांकडे व्यवस्थापनाचे दुर्लक्ष सुधाकर सोनकुसळे : बॅँक ऑफ महाराष्ट्र कर्मचारी संघटनेचे विभागीय अधिवेशन

Next
शिक : बॅँकांमधील मागासवर्गीय कर्मचार्‍यांच्या विविध समस्या व प्रश्नांकडे व्यवस्थापनाकडून गांभीर्याने लक्ष पुरविले जात नाही. केवळ कर्मचार्‍यांनी बॅँकांच्या विविध योजनांची माहिती देत ती ग्राहकांना विक्री करायची आणि व्यवस्थापनाने कर्मचार्‍यांच्या सोयीसुविधांबाबत उदासीनता दाखवायची, अशी बिकट स्थिती सध्या ओढावली आहे; मात्र संघटना कर्मचार्‍यांच्या न्याय्य हक्कासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन बॅँक ऑफ महाराष्ट्र मागासवर्गीय कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर सोनकुसळे यांनी केले.
बॅँक ऑफ महाराष्ट्रच्या मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने नवव्या द्वैवार्षिक विभागीय अधिवेशनामध्ये सोनकुसळे बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर उपमहाप्रबंधक प्रताप मोहंती, सहायक महाप्रबंधक देवीदास वसईकर, आप्पासाहेब गायकवाड, विभागीय अध्यक्ष रवींद्र घोडेराव आदि मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, सोनकुसळे म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून नवीन अंशकालीन कर्मचार्‍यांचा प्रश्न रेंगाळलेला होता. मात्र संघटनेने सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ३६ अंशकालीन कर्मचार्‍यांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावला. संघटनेच्या सर्व सभासदांना न्याय मिळावा, यासाठी संघटना प्रयत्नशील आहे. बॅँक व्यवस्थापनाकडून कर्मचार्‍यांच्या सोयीसुविधांबाबत दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास आज विस्मरणात गेला आहे. बाबासाहेबांचे आर्थिक धोरण व मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारेच रिझर्व्ह बॅँके ची निर्मिती झाली आहे. मुलांना इयत्ता आठवीपर्यंत अनुत्तीर्ण करण्याचे शासनाचे धोरणही चुकीचे आहे. त्यामुळे विद्यार्थी हा स्पर्धेच्या युगात टिक णार नाही, असे आप्पासाहेब गायकवाड यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दरम्यान, विभागीय स्तरावरील संघटनेची नवीन कार्यकारिणी यावेळी जाहीर करण्यात आली. तसेच संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. यावेळी संघटनेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Management questions are ignored by the management Sudhakar Sonkusale: Departmental session of the Bank of Maharashtra Employees Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.