टाटा सन्सकडून व्यवस्थापनात फेरबदल
By admin | Published: November 4, 2016 05:09 PM2016-11-04T17:09:31+5:302016-11-04T17:09:31+5:30
सायरस मिस्त्री यांना चेअरमनपदावरून दूर केल्याने निर्माण झालेला वाद संपलेला नसतानाच टाटा सन्सने आज नव्या व्यवस्थापनाची घोषणा केली.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - सायरस मिस्त्री यांना तडकाफडकी चेअरमनपदावरून दूर केल्याने निर्माण झालेला वाद संपलेला नसतानाच टाटा सन्सने आज नव्या व्यवस्थापनाची घोषणा केली. नव्या व्यवस्थापनामध्ये एस. पद्मनाभन, मुकुल राजन आणि हरिष भट्ट यांच्याकडे महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
टाटा सन्सने एस. पद्मनाभन यांना उद्योग समुहाचे मुख्य एचआर यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय मिस्त्री यांच्या कारकीर्दीत टाटाचे माजी ब्रँड कस्टडियन असलेले मुकुल राजन यांच्याकडे टाटा सन्सच्या अमेरिका, सिंगापूर, दुबई आणि चीनमध्ये कार्यालाये सुरू करण्याच्या शक्यतेबाबत चाचपणी करतील. तसेच हरिश भट यांच्याकडे टाटाच्या ब्रँड व्यवस्थापनाची जबाबदारी असेल.
सायरस मिस्त्री यांना टाटाच्या चेअरमनपदावरून दूर करण्यात आल्यानंतर चार दिवसांनी टाटाच्या एचआर विभाग प्रमुखांनी राजीनामा दिला होता.
Tata Sons announces its organisational changes, Group Human Resources responsibilities will be overseen by S Padmanabhan.
— ANI (@ANI_news) November 4, 2016
Harish Bhat will be responsible for managing the Tata Brand. In interim, he will oversee the functions of Strategy and Business Development.
— ANI (@ANI_news) November 4, 2016
Dr.Mukund Rajan will take responsibility of overseeing the ops of overseas representative offices of Tata Sons in USA, Singapore,Dubai&China
— ANI (@ANI_news) November 4, 2016