मनी लॉंड्रिंगप्रकरणी फुटीरवादी नेता शब्बीर शाहला सात दिवसांची कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 05:04 PM2017-07-26T17:04:41+5:302017-07-26T17:08:58+5:30
मनी लॉंड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेला फुटीरवादी नेता शब्बीर शाह याला कोर्टाने सात दिवसांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत रवानगी केली आहे.
श्रीनगर, दि. 26 - मनी लॉंड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आलेला फुटीरवादी नेता शब्बीर शाह याला कोर्टाने सात दिवसांच्या सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत रवानगी केली आहे.
फुटीरवादी आणि हुर्रियत नेता शब्बीर शाह याला मंगळवारी रात्री उशिरा पोलिसांनी अटक केली होती. त्यांनतर बुधवारी त्याला दिल्लीला आणण्यात आले. शब्बीर शाहला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात दाखल केले असता, कोर्टाने त्याला सात दिवसांच्या सक्तवसुली संचालनालयाची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, शब्बीर शाहला सक्तवसुली संचालनालयाने अनेकदा समन्स पाठवले होते. तरीही तो सक्तवसुली संचालनालयासमोर हजर राहिला नाही. अखेर त्याच्या विरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट काढण्यात आले होते.
No truth to it, it is political vendetta: Separatist Shabir Shah, who was produced in court today, on terror funding case. pic.twitter.com/qeN8NYDqJ6
— ANI (@ANI_news) July 26, 2017
गेल्या दोन दोवसांपूर्वी दहशतवादी संघटनांना फंडिंग केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने सात फुटीरवादी नेत्यांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये फुटीवरवादी नेते गिलानी यांच्या जावयाचाही समावेश आहे. या सर्वांवर काश्मीरमधील दहशतवादी संघटनांनी फंडिंग केल्याचा आरोप आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये अलताफ शाह, अयाझ अकबर, पीर सैफुल्लाह, मेहराज, शाहिद-उल-इस्लाम, नईम खान आणि बिट्टा यांचा समावेश आहे.
याचबरोबर, राष्ट्रीय तपास यंत्रणेने गेल्याच महिन्यात अलताफ शाह यांच्या घरावर धाड टाकली होती. यावेळी शाहिद-उल-इस्लाम यांच्याही परिसरात झडती घेण्यात आली होती. शाहिद-उल-इस्लाम हा हुर्रियत कॉन्फरन्सचे प्रमुख मिरवेज उमर फारुख यांचा साथीदार आहे. अलताफ शाह गिलानी यांचा जावई असून तेहरिक-ए-हुर्रियतसाठीही तो काम करतो. धोरणं विकसित करुन त्यांची अंमलबजावणी करण्यामध्ये त्याचा महत्वाचा सहभाग असतो. फुटीवरवादी संघटनांना मिळणारा निधी खो-यात विध्वंसक गोष्टी आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात असून त्यावर पुर्णपणे बंदी आणण्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणेचा प्रयत्न आहे.
Delhi: Separatist leader Shabir Shah produced in Patiala House Court and sent to 7-day ED custody in terror funding case. pic.twitter.com/bQU3ULiXAm
— ANI (@ANI_news) July 26, 2017
राष्ट्रीय तपास यंत्रणेला काही अकाऊंट बुक्स सापडले आहेत. तसेच दोन कोटींची रोख रक्कम, बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनांचे लेटर-हेड्सही सापडले आहेत. लष्कर-ए-तोयबा आणि हिजबूल मुजाहिद्दीनचे लेटर-हेड्स त्यामध्ये आहेत. 2002 रोजी आयकर विभागाने काही गिलानी यांच्यासह काही फुटीरवादी नेत्यांवर कारवाई करत छापे टाकले होते. यावेळी काही रोख रक्कम आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. मात्र कोणताही गुन्हा त्यावेळी दाखल करण्यात आला नव्हता.
#WATCH Separatist leader Shabir Shah was produced in a Delhi Court and sent to 7-day ED custody in terror funding case. (earlier visuals) pic.twitter.com/stnZ3s6KTS
— ANI (@ANI_news) July 26, 2017