बार्शी मर्चंट्स असो़ अध्यक्षपदी माने, सचिवपदी सोनिग्रा

By admin | Published: July 7, 2015 10:56 PM2015-07-07T22:56:08+5:302015-07-07T22:56:08+5:30

बार्शी -

Manasi as Barshi Merchants or President, Sonigra, secretary | बार्शी मर्चंट्स असो़ अध्यक्षपदी माने, सचिवपदी सोनिग्रा

बार्शी मर्चंट्स असो़ अध्यक्षपदी माने, सचिवपदी सोनिग्रा

Next
र्शी -
दी बार्शी मर्चंट्स असोसिएशनच्या संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून, नूतन अध्यक्षपदी तुकाराम माने , उपाध्यक्षपदी आनंद सोमाणी व विलास ठोंगे यांची तर सचिवपदी अभिजित सोनिग्रा तर शिवशंकर बगले यांची खजिनदार म्हणून अविरोध निवड झाली आहे़
तुळजापूर रोडवरील सहकारी तत्त्वावरील बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यापार्‍यांची विशेष सभा बाजार समितीचे उपसभापती कुंडलिकराव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली़ यामध्ये आगामी तीन वर्षांसाठी मर्चंट्स असो़ चे संचालक मंडळ सर्वसंमतीने निवडण्यात आले़
नूतन पदाधिकारी खालीलप्रमाणे: तुकाराम माने-अध्यक्ष, आनंद सोमाणी, विलास ठोंगे- उपाध्यक्ष, अभिजित सोनिग्रा-सचिव, राजाभाऊ भडुळे -सहसचिव,शिवंशकर बगले-खजिनदार, सुभाष ढाळे-वांदेकमिटी चेअरमन , संचालक मंडळ -वैभव माढेकर, तुषार भिंगार्डे,सुनील पाटील, रामलिंग दराडे, सचिन बागमार यांची अविरोध निवड करण्यात आली़ याचबरोबर असोसिएशनवर बाजारातील सात ज्येष्ठ व्यापार्‍यांची निमंत्रित संचालक म्हणून निवड करण्यात आली आहे़ यामध्ये बाबासाहेब कथले, मल्लिनाथ गाढवे, किशोर शहा, दिलीप गांधी, मैनुद्दीन तांबोळी यांचा समावेश आहे़ नूतन संचालक व पदाधिकार्‍यांचा कंुडलिकराव गायकवाड व तानाजी मांगडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला़ सर्व संचालकांचे बाजार समितीचे चेअरमन तथा आ़ दिलीप सोपल, औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष सुधीर सोपल यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत़
बार्शी मर्चंट्स असो़ ही मार्केट यार्डातील व्यापार्‍यांची जुनी संघटना असून, संस्थेची पंच्याहत्तरीकडे वाटचाल सुरु असून, संस्थेचे २५0 व्यापारी सभासद आहेत़ व्यापार्‍यांच्या अडीअडचणी सोडवण्याला प्राधान्य देण्याबरोबरच शेतकरी हितालादेखील आम्ही प्राधान्य देणार असल्याचे नूतन अध्यक्ष तुकाराम माने यांनी सांगितले़

Web Title: Manasi as Barshi Merchants or President, Sonigra, secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.