सर्जिकल स्ट्राईक ही स्वाभिमान डिवचल्याची प्रतिक्रिया - मनोहर पर्रीकर

By Admin | Published: July 1, 2017 02:00 PM2017-07-01T14:00:25+5:302017-07-01T15:56:05+5:30

पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक हे एका न्यूज चॅनेलच्या अँकरने विचारलेल्या अपमानजक प्रश्नाचं उत्तर होतं असा खुलासा मनोहर पर्रीकर यांनी केला आहे

Manavohar Parrikar's response to the surgical strikes | सर्जिकल स्ट्राईक ही स्वाभिमान डिवचल्याची प्रतिक्रिया - मनोहर पर्रीकर

सर्जिकल स्ट्राईक ही स्वाभिमान डिवचल्याची प्रतिक्रिया - मनोहर पर्रीकर

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
पणजी, दि, 1 - पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईक हे एका न्यूज चॅनेलच्या अँकरने विचारलेल्या अपमानजक प्रश्नाचं उत्तर होतं असा खुलासा माजी केंद्रीय संरक्षणमंत्री आणि गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केला आहे. "भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर एका टीव्ही अँकरने केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांना अपमानजनक सवाल विचारला होता. हा माझ्यासाठी एक अपमान होता. यामुळेच पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये घसून सर्जिकल स्ट्राईक करण्याची योजना आखली", असं मनोहर पर्रीकर बोलले आहेत. 
 
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यवसायिकांशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, "मी नोव्हेंबर 2014 मध्ये जेव्हा संरक्षणमंत्री म्हणून पदभार स्विकारला तेव्हा संरक्षण मंत्रालय पुर्णपणे ढासळलेलं होतं. पुर्णपणे गोंधळाचं वातावरण होतं. 
 
याचवेळी मनोहर पर्रीकरांनी भारत-म्यानमार सीमारेषा आणि भारत-पाकिस्तान सीमेवर करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसंबंधी माहिती दिली. कशाप्रकारे या सर्जिंकल स्ट्राईकचं प्लानिंग करण्यात आलं हेदेखील त्यांनी सांगितलं. पर्रीकर यांनी सांगितलं की, "जेव्हा मला मणिपूरमध्ये 6 डोग्रा रेजिमेंटवर हल्ला झाल्याची आणि त्यात 18 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली तेव्हा ते मला खूप अपमानजक वाटलं. माझ्यासाठी तो वैयक्तिक अपमान होता". "नॅशनल सोशलिस्ट काऊन्सिल ऑफ नागालँडसारख्या छोट्या दहशतवादी संघटनेकडून इतक्या भारतीय जवानांचा मृत्यू होणं हा माझ्यासाठी अपमानच होता", असं पर्रीकर यांनी सांगितलं. 
यानंतर 8 जून रोजी भारतीय लष्कराने थेट म्यानमारमध्ये घुसून आपल्या जवानांच्या हत्येचा बदला घेत अतिरेक्यांचा खात्मा केला होता. 
 
"आम्ही कोणतीही माहिती दिली नसताना ही बातमी लीक झाली होती. मात्र एका प्रश्नाने माझा अपमान झाला. केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड एका कार्यक्रमात कशाप्रकारे सर्जिकल स्ट्राईक करण्यात येतो याची माहिती सांगत होते. यावेळी न्यूज अॅकरने त्यांनी तुम्ही हिच हिंमत वेस्टर्न फ्रंटवर दाखवणार का ? असा सवाल विचारला. एक यशस्वी सर्जिंकल स्ट्राईक केल्यानंतर हा माझ्यासाठी अजून एक अपमान होता. मात्र मी ते शांतपणे ऐकून घेतलं, आणि वेळ आल्यावर याचं उत्तर द्यायचं ठरवलं", असं मनोहर पर्रीकरांनी सांगितलं. 
 
पाकिस्तानमध्ये घुसून करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 15 महिन्यांपासून तयारी सुरु होती. 29 सप्टेंबर 2016 रोजी करण्यात आलेल्या सर्जिंकल स्ट्राईकसाठी 9 जूनपासून म्हणजे 15 महिने आधीच तयारी सुरु झाली होती असा खुलासा मनोहर पर्रीकरांनी केला आहे.
 

Web Title: Manavohar Parrikar's response to the surgical strikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.