मंदिर तोडणार, पुन्हा मशीद बांधणार! राम मंदिराच्या भूमिपूजनानंतर मुस्लिम नेत्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 03:13 PM2020-08-06T15:13:47+5:302020-08-06T15:31:08+5:30
राम मंदिर तोडून तिथे मशीद बांधली जाईल. त्या ठिकाणी मंदिर कधीच नव्हते, असे विधान ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी यांनी केले आहे.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि पुढील निर्देशांनुसार अयोध्येतील राम जन्मभूमीवर राम मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली आहे. या मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रमही काल पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते संपन्न झाला. मात्र असे असले तरी या मुद्द्यावरून काही जणांकडून पुन्हा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. काल एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनी राम मंदिराच्या भूमिपूजनावरून वादग्रस्त विधान केल्यानंतर आता आज अजून एका मुस्लिम नेत्याने या प्रकरणी पुन्हा प्रक्षोभक वक्तव्य केले आहे. राम मंदिर तोडून तिथे मशीद बांधली जाईल. त्या ठिकाणी मंदिर कधीच नव्हते, असे विधान ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष साजिद रशिदी यांनी केले आहे.
साजिद रशिदी म्हणाले की, इस्लाम सांगतो की, मशीद नेहमी मशिदच राहते. अन्य काही बांधकाम केल्याने मशीदीचे अस्तित्व संपत नाही. बाबरी मशीद तिथे होती आणि नेहमीच मशिदीच्या रूपात तिथे राहील. मंदिर तोडून मशीद बांधण्यात आलेली नाही. मात्र आता असे होऊ शकेल. मंदिर पाडून तिथे पुन्हा मशीद बांधली जाईल.
Islam says a mosque will always be a mosque. It can't be broken to build something else. We believe it was, and always will be a mosque. Mosque wasn't built after demolishing temple but now maybe temple will be demolished to build mosque: Sajid Rashidi, Pres, All India Imam Assn pic.twitter.com/DzlbYQ3qdm
— ANI (@ANI) August 6, 2020
दरम्यान, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डानेही राम मंदिरावरून काल वादग्रस्त विधान केले होते. बाबरी मशीद काल होती, आज आहे आणि उद्याही राहील, मशिदीत मूर्ती ठेवल्याने किंवा नंतर पूजा सुरू केल्याने तसेच बराच काळ नमाज पठणास बंदी घातल्याने मशिदीचा दर्जा संपुष्टात येत नाही, बाबरी मशीद ही हिंदूंच्या कुठल्याही प्रार्थनास्थळाला तोडून बांधण्यात आली नव्हती. असे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने आपल्या पत्रकात म्हटले होते. तसेच मंदिर तोडून मशीद बांधण्याबाबत इशारा दिला होता.
एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही राम मंदिराच्या भूमिपूजनावर टीका केली होती. भारत हा एक सेक्युलर देश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराचे भूमिपूजन करून पद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचं उल्लंघन केलं आहे, आजचा दिवस हा लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेच्या पराभवाचा आणि हिंदुत्वाच्या विजयाचा दिवस आहे, असे ओवेसी म्हणाले होते.
इतर महत्त्वाच्या बातम्या
वुहानमधील ९० टक्के कोरोनामुक्त रुग्णांची फुप्फुसे झाली खराब, अभ्यासातून समोर आली धक्कादायक माहिती
टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश
पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल