मनेका गांधींना हवे गोमूत्राचे फिनेल

By Admin | Published: March 25, 2015 01:39 AM2015-03-25T01:39:55+5:302015-03-25T01:39:55+5:30

शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे फरशी आणि स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी रसायनयुक्त फिनाईलऐवजी गोमूत्राद्वारे निर्मित ‘गोनाईल’चा वापर होऊ शकतो.

Maneka Gandhi should get Gomutra's finale | मनेका गांधींना हवे गोमूत्राचे फिनेल

मनेका गांधींना हवे गोमूत्राचे फिनेल

googlenewsNext

नवी दिल्ली : शासकीय कार्यालयांमध्ये यापुढे फरशी आणि स्वच्छतागृहे स्वच्छ करण्यासाठी रसायनयुक्त फिनाईलऐवजी गोमूत्राद्वारे निर्मित ‘गोनाईल’चा वापर होऊ शकतो. कारण महिला व बालकल्याणमंत्री मेनका गांधी यांनी या महिन्याच्या प्रारंभी मंत्रिमंडळातील आपल्या सहकाऱ्यांना एक पत्र पाठवून पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने गोनाईलचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर कें द्रीय भंडारांमध्ये गोनाईलचा साठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्वसामान्यपणे फरशी स्वच्छ करण्यासाठी वापरात येणाऱ्या फिनाईलमध्ये रसायनांचा वापर होत असल्याने ते पर्यावरणाच्या दृष्टीने घातक असल्याचे मेनका गांधी यांचे म्हणणे आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 

Web Title: Maneka Gandhi should get Gomutra's finale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.