मनेका गांधी यांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल
By admin | Published: June 2, 2017 05:16 PM2017-06-02T17:16:44+5:302017-06-02T18:43:35+5:30
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांची तब्येत शुक्रवारी अचानक बिघडल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात
Next
ऑनलाइन लोकमत
पिलिभित, दि. 02 - केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांची तब्येत शुक्रवारी अचानक बिघडल्याने त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मनेका गांधी आपल्या मतदारसंघातील पिलिभित येथील एका आयोजित कार्यक्रमासाठी याठिकाणी आल्या होत्या. त्यावेळी त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्यांना रुग्णालयातील इमर्जन्सी वार्डमध्ये ठेवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, त्यांना पिलिभित येथील रुग्णालयातून एअरलिफ्टच्या मदतीने दिल्लीतील मेदांता किंवा एम्स रुग्णालयात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मिळते.
मनेका गांधी शुक्रवारी दोन दिवसांच्या पिलिभित दौ-यासाठी दाखल झाल्या होत्या. त्या पिलिभित मतदारसंघाच्या खासदार आहेत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारमध्ये त्यांच्याकडे केंद्रीय महिला व बालविकास मंत्रीपद आहे.
Uttar Pradesh: Union Minister Maneka Gandhi admitted to emergency ward of a hospital in Pilibhit after breathing problem.
— ANI UP (@ANINewsUP) June 2, 2017
Official deny that Maneka Gandhi is facing breathing problem, says she has stone problem in gall bladder and might be airlifted to Delhi.
— ANI UP (@ANINewsUP) June 2, 2017