इंडिगो विमानाला पक्ष्याची धडक, 160 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 05:42 PM2023-05-25T17:42:13+5:302023-05-25T17:42:46+5:30
प्रवाशांना बंगळुरूहून आलेल्या इंडिगोच्या दुसऱ्या विमानाने प्रवाशांना दुबईला पाठवण्यात आले.
मंगळुरु : मंगळुरूहून दुबईला जाणाऱ्या इंडिगोच्याविमानाची पक्ष्याला धडक बसल्याने मोठा अपघात टळला. दुबईला जाणाऱ्या इंडिगोच्याविमानाला पक्षी धडकल्यानंतर विमान धावपट्टीवरून एप्रनकडे वळवण्यात आले. यावेळी विमानात 160 हून अधिक प्रवासी होते, त्यांना विमानातून उतरवावे लागले.
ही घटना मंगळुरु आंतरराष्ट्रीय विमानतळावर (MIA) सकाळी 8.25 वाजता इंडिगोचे विमान 6E 1467 IXE-DXB सोबत घडली. ही घटना घडली तेव्हा विमान धावपट्टीवर जात होते. दरम्यान, या घटनेमुळे विमानतळावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
याबाबत पायलटने एअर ट्रॅफिक कंट्रोलला (एटीसी) माहिती दिल्यानंतर, विमान विमानतळाच्या एप्रनवर परतले, ज्याठिकाणी सर्व उड्डाणे उभी असतात. तसेच, त्यांनी सांगितले की, तांत्रिक तज्ज्ञ विमानाची तपासणी करत आहेत. यानंतर, प्रवाशांना बंगळुरूहून आलेल्या इंडिगोच्या दुसऱ्या विमानाने प्रवाशांना दुबईला पाठवण्यात आले. सूत्रांनी सांगितले की, दुबईसाठी विमानाचे वेळापत्रक बदलले आणि सकाळी 11.05 वाजता उड्डाण केले.
एप्रिमध्ये नेपाळमध्ये घडली होती घटना
याआधी एप्रिलमध्ये फ्लाय दुबईच्या एका विमान पक्षी आदळल्यानंतर इंजिनमध्ये आग लागली होती. नेपाळमधील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर ही घटना घडली. घटनेच्या वेळी विमानात दीडशेहून अधिक प्रवासी होते.