भरधाव कारची धडक; पादचारी १०० फूट दूर जाऊन पडला; अंगावर काटा आणणारा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 03:45 PM2021-03-30T15:45:29+5:302021-03-30T15:47:48+5:30

मद्यपान करून कार चालवणाऱ्या सरकारी अधिकाऱ्याला अटक; भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

Mangaluru government official runs over man arrested for drunken driving | भरधाव कारची धडक; पादचारी १०० फूट दूर जाऊन पडला; अंगावर काटा आणणारा VIDEO

भरधाव कारची धडक; पादचारी १०० फूट दूर जाऊन पडला; अंगावर काटा आणणारा VIDEO

Next

मंगळुरू: भरधाव कारनं दिलेल्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळुरूत घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सरकारी अधिकाऱ्याला अटक केली आहे. हा अधिकारी मद्यपान करून गाडी चालवत असल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. मंगळुरूतल्या सर्किट हाऊस परिसरात रविवारी रात्रीच्या सुमारास भरधाव कारनं वृद्धाला धडक दिली. हा अपघातसीसीटीव्हीत कैद झाला.

या प्रकरणी पोलिसांनी शनमुगम नावाच्या सरकारी अधिकाऱ्याला अटक केली आहे. तो दक्षिण कन्नाडामधील सूक्ष्म सिंचन आणि भूजल विभागात सहायक कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत आहे. मद्यपान करून कार चालवत असलेल्या शनमुगमनं सर्किट हाऊस परिसरात ६२ वर्षीय ए. आनंदा यांना धडक दिली. भारत संचार निगम लिमिटेडमधून निवृत्त झालेले आनंदा सध्या उडुपीतील एका कंपनीसाठी काम करत होते. 



बसमधून उतरून रस्त्याच्या कडेनं घराकडे निघालेल्या आनंदा यांना शनमुगम यांच्या कारनं जोरदार धडक दिली. रविवारी रात्री १० च्या सुमारास हा भीषण अपघात घडला. शनमुगमच्या कारचा वेग इतका जास्त होता की शनमुगन १०० फुटांपेक्षा अधिक अंतरावर फेकले गेले. गंभीर जखमी झालेल्या आनंदा यांना उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

मंगळुरूचे पोलीस आयुक्त एन. शशी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनमुगम कार चालवता शुद्धीत नव्हते. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आलं आहे. यामध्ये भरधाव कार सर्किट हाऊसहून वेगानं येताना दिसत आहे. या कारनं आधी बॅरिकेडिंगला जोरदार धडक दिली. त्यानंतर कारनं आनंदा यांना धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की आनंदा बऱ्याच लांबवर जाऊन पडले.

Web Title: Mangaluru government official runs over man arrested for drunken driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.