खरिपावर मका-सोयाबीनची छाप, बाजरीचे क्षेत्र लाखाने घटले
By admin | Published: July 13, 2017 05:28 PM2017-07-13T17:28:53+5:302017-07-13T23:53:23+5:30
पावसाने ओढ दिल्याने रखडल्या पेरण्या
पावसाने ओढ दिल्याने रखडल्या पेरण्या
गणेश धुरी
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : खरीप हंगामात चालू वर्षात खरीप बाजरीचे क्षेत्र कमालीचे घटले असून, मका व सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. बाजरीचे ७५ हजार ते एक लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्र घटून, त्याऐवजी मका पिकाचे ५० हजारावरून वाढत वाढत यावर्षी चक्क पावणेदोन लाख हेक्टरच्या आसपास क्षेत्र पोहोचले आहे. खरिपाच्या एकूण लागवडीतही सर्वाधिक पेरण्या मका पिकाच्या पेरण्या ८६ टक्के तर सोयाबीनच्या पेरण्या ६३ टक्के क्षेत्रावर झाल्या आहेत.
११ जुलै अखेर खरीप हंगामाच्या ६ लाख ५२ हजार ५०० हेक्टर क्षेत्रापैकी ३ लाख ६३ हजार ५६८ हेक्टर ( ४७.४४ टक्के) क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत. भात पिकाचे खरिपाचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र ६६ हजार ७०० असताना, प्रत्यक्षात १८ हजार ७२२ (२८ टक्के) हेक्टर क्षेत्रावर, ज्वारीचे ३९०० हेक्टर क्षेत्रापैकी १४५ हेक्टर (३.६३), बाजरी १ लाख ६२ हजार २०० हेक्टर क्षेत्रापैकी ७५ हजार ८५२ हेक्टर ( ४७.३४), नागलीचे ३५ हजार ३०० हेक्टर क्षेत्रापैकी ४ हजार ७०२ हेेक्टर (१३.३०) मका पिकाचे १ लाख ७३ हजार हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात १ लाख ५० हजार ३१३ (८६. ८७) हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. खरीप तुरीचे सरासरी लागवडीखालील क्षेत्र १० हजार ४०० हेक्टर असताना प्रत्यक्षात ५ हजार २०१ (४९ टक्के) क्षेत्रावर पेरणी झाली आहे. उडीद पिकाचे १४ हजार ७०० हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात ७ हजार ५५९ हेक्टर क्षेत्रावर (५१ टक्के) भुईमूग पिकाचे ३१ हजार ३०० हेक्टर सरासरी लागवडीखालील क्षेत्र असताना प्रत्यक्षात १५ हजार ५७४ हेक्टर (१५१ टक्के) क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीन पिकाचे सरासरी लागवडीखालील ५७ हजार हेक्टर क्षेत्र असताना प्रत्यक्षात ३६ हजार १६५ हेक्टर ( ६३.४३ टक्के) क्षेत्रावर सोयाबीन पिकाच्या पेरण्या झाल्या आहेत. जूनमध्ये दमदार हजेरी लावणार्या पावसाने गेल्या दोन आठवड्यांपासून दडी मारल्याने खरिपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. अजून आठवडाभर पाऊस झाला नाही, तर काही भागात दुबार पेरण्या करण्याचे संकट ओढवण्याची चिन्हे आहेत. खरिपाच्या साडेसहा लाख हेक्टर क्षेत्रात सर्वाधिक बाजरीचे अडीच ते पावणेतीन लाख हेक्टरचे क्षेत्र दीड लाखापर्यंत खाली आले आहे.