मणिशंकर अय्यर यांना काँग्रेसमधून केलं निलंबित, मोदींबद्दलचं वादग्रस्त विधान भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 10:48 PM2017-12-07T22:48:26+5:302017-12-07T22:54:03+5:30

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टीका करणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे.

Mani Shankar Aiyar suspended from Congress, controversial statement about Modi | मणिशंकर अय्यर यांना काँग्रेसमधून केलं निलंबित, मोदींबद्दलचं वादग्रस्त विधान भोवलं

मणिशंकर अय्यर यांना काँग्रेसमधून केलं निलंबित, मोदींबद्दलचं वादग्रस्त विधान भोवलं

googlenewsNext

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खालच्या पातळीवर टीका करणारे काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांना काँग्रेस पक्षातून निलंबित करण्यात आलं आहे. तसेच निलंबित करत असताना काँग्रेस पक्षानं त्यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना मणिशंकर अय्यर यांनी असंसदीय अशा 'नीच' या शब्दाचा वापर केला होता. त्यामुळे त्यांच्यावर आरजेडीच्या लालूप्रसाद यादवांपासून काँग्रेसच्या नेत्यांची टीकेची झोड उठवली होती. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी मणिशंकर अय्यर यांच्या विधानापासून हात झटकत त्यांना खडे बोल सुनावले होते.

भाजपासारखी पातळी सोडून टीका करणं ही काँग्रेसची संस्कृती नाही. मणिशंकर यांनी वापरलेल्या असंसदीय भाषेबाबत त्यांना माफी मागायला हवी, असं म्हणत राहुल गांधी यांनी मणिशंकर यांना सुनावले होते. त्यानंतर मणिशंकर अय्यर यांनीही माफी मागितली होती. मणिशंकर यांच्यावर आम्ही कारवाई केली आहे. 'मोदीजी, तुम्ही अशा प्रकारचं धाडस दाखवू शकाल का?', असा सवालही काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी ट्विटरच्या माध्यमातून उपस्थित केला आहे. 



आरजेडीचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी काँग्रेस  नेते मणिशंकर अय्यर यांच्यावर टीका केली आहे. काँग्रेसच्या समर्थनार्थ नेहमीच बोलणा-या लालूंनी काँग्रेस नेत्यालाच लक्ष्य केल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अय्यर यांनी मोदींना नीच असं संबोधल्यानंतर लालूंनी त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचं सांगितलं आहे. पाटण्यात पत्रकारांनी छेडले असता लालूप्रसाद यादव यांनी हे विधान केलं आहे.

परंतु मणिशंकर अय्यर यांच्या या विधानाला पंतप्रधान नरेंद्र मोदीच जबाबदार असल्याचंही लालूंनी सांगितलं आहे. मोदींनी उचकवल्यामुळेच मणिशंकर अय्यर यांनी हा शब्द उच्चारल्याचंही लालू म्हणाले आहेत. या देशात राजनैतिक मर्यादा, भाषा व व्याकरण फक्त आणि फक्त एकाच व्यक्तीच्या नजरेतून पाहिलं जातंय, असं म्हणत लालूंनी मोदींवरही निशाणा साधला आहे. 

Web Title: Mani Shankar Aiyar suspended from Congress, controversial statement about Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.