धक्कादायक...! भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या नेत्यानं वक्फ कायद्याचं समर्थन केलं, जमावानं अख्खं घर पेटवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 11:58 IST2025-04-07T11:57:34+5:302025-04-07T11:58:30+5:30

अली यांनी शनिवारी सोशल मीडियावर या कायद्याला पाठिंबा दर्शवला होता...

manipur BJP Minority Front leader Askar Ali supported the Waqf Act, mob set the entire house on fire | धक्कादायक...! भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या नेत्यानं वक्फ कायद्याचं समर्थन केलं, जमावानं अख्खं घर पेटवलं!

धक्कादायक...! भाजप अल्पसंख्यक मोर्चाच्या नेत्यानं वक्फ कायद्याचं समर्थन केलं, जमावानं अख्खं घर पेटवलं!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वक्फ (सुधारणा) विधेयक-2025 ला मंजुरी दिली आहे. यानतंर आता या विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाले आहे. गेल्या आठवड्यांत रात्री उशिरापर्यंत चर्चा  होऊन लोकसभा आणि राज्य सभेत हे विधेयक मंजूर झाले होते. हे विधेयक मंजूर झाल्यापासूनच मुस्लीम समाजाच्या एका वर्गात अद्यापही नाराजी दिसत आहे. यातच, गेल्य रात्री भाजपच्या एका नेत्याचे घर जाळण्याचा प्रकार घडला आहे. असगर अली असे या नेत्याचे नाव आहे. त्यांनी वक्फ सुधारणा कायद्याचे समर्थन करत केले होते. ते याच्या वैशिष्ट्यांसंदर्भात माहिती देत होते. 

मणिपूर भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष असगर अली यांचे घर जमावाने पेटवून दिले आहे. यासंदर्भात बोलताना अधिकाऱ्यानेम म्हटले आहे. की, ही घटना थौबल जिल्ह्यातील लिलोंग येथे घडली. तत्पूर्वी, अली यांनी शनिवारी सोशल मीडियावर या कायद्याला पाठिंबा दर्शवला होता.

संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 9 वाजण्याच्या सुमारास भडकलेला जमाव अली यांच्या घराबाहेर जमला. या जमावाने आधी त्यांच्या घराची तोडफोड केली आणि नंतर त्याला आग लाऊन दिली. या घटनेनंतर अली यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत, आपल्या मागिल विधानासंदर्भात माफी मागितली आहे. तसेच, या कायद्याप्रति त्यांनी विरोधही दर्शवला आहे. 

यापूर्वी, वक्फ सुधारणा कायद्या विरोधात इंफाळ खोऱ्यातील अनेक भागांत निदर्शनेही झाली. पाच हजारहून अधिक लोकांनी एका रॅलीत भाग घेतला होता. यामुळे राष्ट्रीय महामार्ग-102 वरील वाहतूकही विस्कळीत झाली होती. याच बरोबर, या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका देखील सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. 

जमियत उलेमा-ए-हिंद (एएम) या मुस्लीम संघटनेने देखील वक्फ (दुरुस्ती) कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. यात, हे मुस्लिमांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावण्याचे एका षड्यंत्र असल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय, काँग्रेस खासदार मोहम्मद जावेद, AIMIM अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी आणि आप आमदार अमानतुल्लाह खानसह इतरही काही लोकांनी या विधेयकाला सर्वोच्च न्यायालयात आव्हाण देणारी याचिका केल आहे. 

Web Title: manipur BJP Minority Front leader Askar Ali supported the Waqf Act, mob set the entire house on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.