मणिपूरच्या राज्यपालांकडून भाजपाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रण
By admin | Published: March 14, 2017 06:50 PM2017-03-14T18:50:11+5:302017-03-14T18:50:11+5:30
मणिपूरमध्येही भाजपा सरकार स्थापन करणार हे आता निश्चित झाले आहे. मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - गोव्यानंतर आता मणिपूरमध्येही भाजपा सरकार स्थापन करणार हे आता निश्चित झाले आहे. मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी भाजपाला सरकार स्थापनेसाठी निमंत्रित केले आहे. आता भाजपाचे विधिमंडळ नेते एन. बिरेन सिंग बुधवारी पद आणि गोपनीयतेची शपथ घेणार आहेत.
मणिपूरमध्ये त्रिशंकू निकाल लागले होते. त्यात काँग्रेसला 28 तर भाजपाला 31 जागा मिळाल्या होत्या. तर 11 जागा स्थानिक पक्षांच्या खात्यात गेल्या होत्या. मात्र मणिपूरमध्ये पहिल्यांदाच घसघशीत यश मिळवणाऱ्या भाजपाने एनपीपी आणि एनपीएफ या पक्षांच्या प्रत्येकी चार आणि लोकजनशक्ती पक्ष आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रत्येकी एका आमदाराचा पाठिंबा मिळवत सत्तास्थापनेसाठी दावा केला. तर काँग्रेसकडूनही बहुमताचा आकडा गाठण्यासाठी हालचाली झाल्या, पण त्यात यश मिळाले नाही.
अखेर आज राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी भाजपाला मणिपूरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी औपचारिक निमंत्रण दिले. दरम्यान, उद्या होणाऱ्या भाजपाच्या शपथविधी सोहळ्याला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग उपस्थित राहणार आहेत.
BJP led group has been invited tomorrow to form the Government. Ceremony at 1 pm: Najma Heptulla,Manipur Governor pic.twitter.com/OAWSZwcbHT
— ANI (@ANI_news) March 14, 2017