मणिपूरचे राज्यपाल सय्यद अहमद यांचे निधन

By Admin | Published: September 27, 2015 06:36 PM2015-09-27T18:36:31+5:302015-09-27T18:46:05+5:30

मणिपूरचे राज्यपाल सय्यद अहमद यांचे रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते.

Manipur Governor Syed Ahmad dies | मणिपूरचे राज्यपाल सय्यद अहमद यांचे निधन

मणिपूरचे राज्यपाल सय्यद अहमद यांचे निधन

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २७ - मणिपूरचे राज्यपाल सय्यद अहमद यांचे रविवारी मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा व दोन मुला असा परिवार आहे. 

१९७७ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश करणारे सय्यद अहमद हे तब्बल पाच वेळा मुंबईतील नागपाडा मतदार संघातून विधानसभेवर निवडून आले होते.  २०११ मध्ये झारखंड व त्यानंतर २०१५ मध्ये मणिपूरच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. राजकारणासोबतच अहमद यांना लेखनाचीही आवड होती. उर्दूत लिखाण करण्याची त्यांना विशेष आवड होती. अहमद यांनी हिंदी व इंग्लिशमध्ये एमए केले असून उर्दू भाषेत त्यांनी डॉक्टरेटची पदवीही मिळवली होती.  अहमद यांच्या निधनावर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.  

 

Web Title: Manipur Governor Syed Ahmad dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.