बलात्कार अन् नग्न अवस्थेत धिंड! तीन महिन्यांनी खुलासा; मेरठमध्ये मणिपूरच्या घटनेची पुनरावृत्ती 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 05:45 PM2023-07-26T17:45:05+5:302023-07-26T17:45:27+5:30

उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे.

  Manipur incident repeated in Uttar Pradesh's Meerut, three arrested for stripping girl naked  | बलात्कार अन् नग्न अवस्थेत धिंड! तीन महिन्यांनी खुलासा; मेरठमध्ये मणिपूरच्या घटनेची पुनरावृत्ती 

बलात्कार अन् नग्न अवस्थेत धिंड! तीन महिन्यांनी खुलासा; मेरठमध्ये मणिपूरच्या घटनेची पुनरावृत्ती 

googlenewsNext

मेरठ : उत्तर प्रदेशातील मेरठ येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. मणिपूर राज्य हिंसाचाराच्या आगीने जळत असतानाच तिथून एक धक्कादायक घटना समोर आली होती. मणिपूरमध्ये नग्न अवस्थेत महिलांची धिंड काढल्याची घटना ताजी असतानाच उत्तर प्रदेशात या घटनेची पुनरावृत्ती झाल्याचे दिसते. इथे एका आरोपीने आधी तरुणीवर बलात्कार केला नंतर आरोपीच्या साथीदारांनी मुलीला विवस्त्र अवस्थेत उसाच्या शेतातून ओढत बाहेर आणले. संबंधित आरोपींवर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे. घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कुटुंबीयांना या प्रकरणाची माहिती मिळाली.
  
खरं तर तीन महिन्यांपूर्वी मेरठमधील किठोरे गावात एका तरुणाने तरुणीला आमिष दाखवून उसाच्या शेतात नेऊन तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर तरुणाचे साथीदार उसाच्या शेतात आले, त्यांनी तरुणीचा व्हिडीओ बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर आरोपींनी कधी तरुणीला पोलिसांना बोलावण्याचा धाक दाखवला तर कधी तिच्याशी गैरवर्तन केले. याशिवाय नराधमांनी तिला मारहाण देखील केली. तरुणीने विरोध केला असता आरोपींनी तिला विवस्त्र करून उसाच्या शेतातून रस्त्यावर आणले.

बहिणीच्या मोबाईलवर पाठवला व्हिडीओ
आरोपींनी व्हिडीओ काढल्यामुळे पीडित तरूणी दबावाखाली होती. मागील रविवारी मुलीसोबत घडलेल्या घटनेचा व्हिडीओ आरोपींनी तिच्या बहिणीच्या मोबाईलवर पाठवला. व्हिडीओ पाहिल्यानंतर पीडितेची चौकशी केली असता तिने संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पीडितेच्या तक्रारीनुसार, आरोपी जाहिद आणि त्याचे दोन साथीदार पप्पू उर्फ ​​जावेद आणि आलम यांना अटक करण्यात आली आहे. तर व्हिडीओ बनवणारे दोन अन्य आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीवर दोन वर्षांपासून लग्नाच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप आहे. सामूहिक बलात्कार असल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत पण यात तथ्य नाही. कारण काही महिन्यांपूर्वी पीडित तरुणी आरोपींसोबत एकांतात असताना काही तरुणांनी त्यांचा अश्लिल व्हिडीओ बनवला आणि ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

Web Title:   Manipur incident repeated in Uttar Pradesh's Meerut, three arrested for stripping girl naked 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.