"तिकडे मणिपूर जळतंय, इकडे पंतप्रधान चित्रपटावर बोलताहेत," केरळ स्टोरीच्या वक्तव्यावरून ओवेसींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2023 03:42 PM2023-05-06T15:42:27+5:302023-05-06T15:45:09+5:30

एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.

Manipur is burning PM narendra modi is talking about the kerala story asaduddin owaisi targets | "तिकडे मणिपूर जळतंय, इकडे पंतप्रधान चित्रपटावर बोलताहेत," केरळ स्टोरीच्या वक्तव्यावरून ओवेसींचा पलटवार

"तिकडे मणिपूर जळतंय, इकडे पंतप्रधान चित्रपटावर बोलताहेत," केरळ स्टोरीच्या वक्तव्यावरून ओवेसींचा पलटवार

googlenewsNext

कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागलंय. बजरंग दल, जय बजरंगबली ते द केरळ स्टोरी या चित्रपटापर्यंतचे मुद्दे सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका दिवसापूर्वी कर्नाटकातील बेल्लारी येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना द केरळ स्टोरीचा उल्लेख केला होता आणि विरोधी काँग्रेस पक्षावर जोरदार हल्ला चढवला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या वक्तव्यावर आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी पलटवार केलाय. “कर्नाटकात निवडणुका नक्कीच आहेत. परंतु दहशतवाद्यांनी आपल्या पाच जवानांना शहीद केलं. मणिपूरही जळत आहे,” असं ओवेसी म्हणाले. “गाव, चर्च जळत आहेत. परंतु पंतप्रधान त्या वाईट चित्रपटाबद्दल बोलत आहेत आणि कर्नाटक निवडणुकीत फायदा घेऊ इच्छितात. पंतप्रधान फिल्म प्रमोट करतायत आणि तिकडे पाकिस्तान आपल्या जवानांना शहीद करतोय,” असंही ते म्हणाले.

“ती बनावट मुव्ही आहे. आमचा बुर्का दाखवून पैसे कमावू इच्छित आहेत. पंतप्रधान द्वेष पसरवत आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी इतकी पातळी घसरली आहे. त्यांना आम्हाला कोणती शिक्षा द्यायची आहे. केवळ भाष करू नका आणि आपल्या जवानांवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानला थांबवा,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.

काय म्हणाले होते मोदी?

केरळ स्टोरी’ चित्रपटाच्या वादाला आता राजकीय रंग लागला आहे. काँग्रेस, डावे पक्ष आणि मुस्लीम संघटना या चित्रपटाला विरोध करत आहेत आणि या चित्रपटाच्या टायमिंगवर प्रश्न उपस्थित करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी या चित्रपटाचा संदर्भ देत काँग्रेस समाजाला उद्ध्वस्त करणाऱ्या ‘दहशतवादी प्रवृत्तीं’च्या पाठीशी उभा असल्याचा आरोप केला. काँग्रेस दहशतवादी प्रवृत्ती असलेल्यांशी राजकीय सौदेबाजी करत आहे. दहशतवादाविरोधात भाजप नेहमीच कठोर आहे. जेव्हा-जेव्हा दहशतवादाविरुद्ध कारवाई होते, तेव्हा काँग्रेसच्या पोटात दुखतं, असे पंतप्रधान म्हणाले.

Web Title: Manipur is burning PM narendra modi is talking about the kerala story asaduddin owaisi targets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.