मणिपूर विधानसभेत आज होणार शक्तिपरीक्षा
By admin | Published: March 20, 2017 12:49 AM2017-03-20T00:49:15+5:302017-03-20T00:49:15+5:30
मणिपूर विधानसभेत सोमवारी मुख्यमंत्री एन. विरेंद्र सिंह यांची शक्तिपरीक्षा होत असून भाजप आणि काँग्रेसने आपले धोरण काय असेल
गुवाहाटी : मणिपूर विधानसभेत सोमवारी मुख्यमंत्री एन. विरेंद्र सिंह यांची शक्तिपरीक्षा होत असून भाजप आणि काँग्रेसने आपले धोरण काय असेल हे कळू दिलेले नाही.
भाजपचे नव्याने निवडून आलेले २१ पैकी १७ आमदार येथील हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत तर काँग्रेसच्या २७ आमदारांचा इम्फाळमधील आमदाराच्या घरी मुक्काम आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याच पक्षाला बहुमत मिळालेले नाही. राज्यात काँग्रेसची सलग १५ वर्षे सत्ता होती.
या निवडणुकीत ६० सदस्यांच्या विधानसभेत सर्वाधिक २८ तर भाजपला २१ जागा मिळाल्या. सरकार स्थापन करण्यासाठी पक्षाला ३१ आमदारांची गरज आहे. भाजपने आम्हाला एन. पी. पी. एन.पी. एफ, एल. जे. पी व अपक्ष अशा ३३ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे.