बंगालमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती, महिलेचे कपडे फाडले, विवस्त्र फिरवले, TMCच्या कार्यकर्त्यांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 04:53 PM2023-07-21T16:53:14+5:302023-07-21T16:53:58+5:30

West Bengal News: मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. येथील हावडा येथे एका महिलेसोबत गैरवर्तन करून तिला विवस्त्र फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

Manipur repeat in Bengal, woman's clothes torn, naked, accused of TMC workers | बंगालमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती, महिलेचे कपडे फाडले, विवस्त्र फिरवले, TMCच्या कार्यकर्त्यांवर आरोप

बंगालमध्ये मणिपूरची पुनरावृत्ती, महिलेचे कपडे फाडले, विवस्त्र फिरवले, TMCच्या कार्यकर्त्यांवर आरोप

googlenewsNext

मणिपूरमध्ये कुकी आण मैतेयी समुदायांमध्ये सुरू असलेल्या हिंसक संघर्षादरम्यान, येथील दोन महिलांना विवस्त्र करून जमावाने त्यांची धिंड काढल्याचा व्हिडीओ समोर आला होता. त्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. दरम्यान, मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती पश्चिम बंगालमध्ये घडली आहे. येथील हावडा येथे एका महिलेसोबत गैरवर्तन करून तिला विवस्त्र फिरवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीतील महिला उमेदवाराने तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर छेडछाड आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केला आहे. ही घटना ८ जुलै रोजी घडल्याचं सांगण्यात येत आहे. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी आपल्याला विवस्र करून गावभर फिरवल्याचा आरोप पीडितेने केला आहे. दरम्यान, या प्रकरणी पांचला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितलं की, तृणमूल काँग्रेसच्या सुमारे ४० ते ५० कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली. माझ्या छातीवर, डोक्यावर दंडुक्याने प्रहार केले. त्यानंतर मला मतदानकेंद्राबाहेर फेकून दिले. दरम्यान, या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरच्या कॉपीमध्ये तृणमूलचे उमेदवार हेमंत राय, नूर आलम, अल्फी एसके, रणबीर पांजा संजू, सुकमल पांजासह अनेक जणांची नावं आहेत. या लोकांनी माझे कपडे फाडण्याचा प्रयत्न केला. तसेच मला विवस्त्र होण्यास भाग पाडले. सर्वांसमक्ष माझी छेड काढली. तसेच मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख आणि पश्चिम बंगालमधील पक्षाचे सहप्रभारी अमित मालविय यांनी ममता बॅनर्जीं यांच्यावर निशाणा साधला आहे. ममता बॅनर्जी यांना थोडी तरी लाज आहे का, तुमच्या राज्य सचिवालयापासून काही अंतरावर ही घटना घडली आहे. तुम्ही एक अयशस्वी मुख्यमंत्री आहात. तुम्ही तुमच्या बंगालवर लक्ष दिलं पाहिजे.  

Web Title: Manipur repeat in Bengal, woman's clothes torn, naked, accused of TMC workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.