या राज्यात भाजपा सरकार संकटात, तीन आमदारांनी दिला राजीनामा दिला, मित्रपक्षही दुरावले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 10:01 PM2020-06-17T22:01:24+5:302020-06-17T22:05:52+5:30
मणिपूरमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाच्या एस. सुभाषचंद्र सिंह, टी.टी. हाओकीप आणि सॅम्युएल जेंदाई यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे.
मणिपूर - पूर्वोत्तर भारतातील मणिपूरमध्ये मोठा राजकीय भूकंप झाला असून, राज्यात सत्तेवर असलेल्या भाजपाच्या तीन आमदारांनी पदराचा राजीनामा दिला आहे. या तिन्ही आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तसेच अन्य मित्र पक्षाच्या आमदारांनीही मंत्रिपदांचा राजीनामा देऊन भाजपा सरकारला असलेला आपला पाठिंबा काढून घेतला आहे.
मणिपूरमध्ये सत्तेत असलेल्या भाजपाच्या एस. सुभाषचंद्र सिंह, टी.टी. हाओकीप आणि सॅम्युएल जेंदाई यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. या नेत्यांनी आता काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. तर एनपीपीच्या वाय. जोयकुमार सिंह, एन. कायिसी आणि एल. जयंताकुमार सिंह, लेतपाओ हाओकिप यांनी आपल्या मंत्रिपदांचा राजीनामा दिला आहे. तसेच टीएमसीचे आमदार टी, रबींद्रो आणि अपक्ष आमदार शमसुद्दीन यांनी भाजपा सरकारला असलेला पाठिंबा काढून घेतला आहे.
Manipur: S Subhashchandra Singh, TT Haokip & Samuel Jendai resign as BJP MLAs&join Congress. NPP's Y Joykumar Singh, N. Kayisii, L Jayanta Kumar Singh & Letpao Haokip, resign from ministerial posts. TMC's T Robindro Singh&Independent MLA Shahabuddin withdraw their support to BJP.
— ANI (@ANI) June 17, 2020