Manipur Violence: मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, जमावाचा भाजप कार्यालयाजवळ टायर जाळून रास्ता रोको
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2023 10:49 PM2023-06-29T22:49:46+5:302023-06-29T22:50:11+5:30
गुरुवारी रात्री उशिरा मणिपूरच्या इंफाळमधील भाजपच्या प्रदेश कार्यालयाजवळ जमाव जमला. त्यांना रोखण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.
मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार झाल्याची बातमी आली आहे. गुरुवारी रात्री उशिरा मणिपूरच्या इंफाळमधील भाजपच्या प्रदेश कार्यालयाजवळ जमाव जमला. यादरम्यान माहिती मिळताच पोलिसांनी त्यांना रोखण्यासाठी अश्रुधुराच्या अनेक फैरी झाडल्या. पोलिसांचा जमावाने निषेध केला. पहाटे काही अज्ञात दंगलखोरांनी मणिपूरमधील कांगपोकपी जिल्ह्यातील हरोथेल गावात कोणतीही चिथावणी न देता गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून काही जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण होते.
शरद पवारांच्या निमंत्रणावरुन PM मोदी महाराष्ट्रात येणार, पवारांनीच सांगितली तारीख
या परिसरातून एक मृतदेह सापडला असून काही जण जमिनीवर पडलेले दिसत आहेत. अधिकृत सूत्रांनी सांगितले की, या भागात अजूनही गोळीबार सुरू असल्याने जमिनीवर पडलेले लोक मृत झाले की जखमी झाले हे लगेच स्पष्ट झाले नाही. लष्कराच्या अधिकृत ट्विटर हँडलवर तपशील देताना असे म्हटले आहे की, सशस्त्र दंगलखोरांनी सकाळी ५.३० वाजता कोणत्याही गोळीबार सुरू केला.
लष्कराच्या 'स्पीअर कॉर्प्स'च्या अधिकृत हँडलने सांगितले की, परिस्थिती आणखी बिघडू नये म्हणून या भागात तैनात करण्यात आलेल्या तुकड्या तातडीने जमवण्यात आल्या. दंगलखोरांच्या गोळीबाराला जवानांनी व्यवस्थित प्रत्युत्तर दिले. सैन्याच्या तत्पर कारवाईमुळे गोळीबार थांबला. या भागात अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले. परिसरात मोठ्या प्रमाणात लोक जमा झाल्याचीही माहिती आहे. परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
मे'च्या सुरुवातीला मणिपूरमध्ये मेईतेई आणि कुकी समुदायांमध्ये झालेल्या वांशिक हिंसाचारात १०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मणिपूरमधील अनुसूचित जमाती (एसटी) दर्जा मिळण्याच्या मेईतेई समुदायाच्या मागणीला विरोध करण्यासाठी ३ मे रोजी पहाडी जिल्ह्यांमध्ये 'आदिवासी एकता मोर्चा' काढण्यात आल्यानंतर संघर्ष सुरू झाला. मणिपूरच्या लोकसंख्येपैकी ५३ टक्के मेईटीस आहेत आणि ते प्रामुख्याने इंफाळ खोऱ्यात राहतात. नागा आणि कुकी सारख्या आदिवासी समुदायांची लोकसंख्या ४० टक्के आहे आणि ते प्रामुख्याने डोंगराळ जिल्ह्यांमध्ये राहतात.
#WATCH | A crowd gathered near the regional office of BJP in Imphal, Manipur. Police used several rounds of tear gas shells to stop and disperse them.
— ANI (@ANI) June 29, 2023
Visuals from the spot. pic.twitter.com/9NvUUoM68c