डोळे काढले, गुढघ्यावर गोळी मारली अन्... मणिपूरमधल्या ६ जणांच्या हत्येने उडाला थरकाप

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 12:50 PM2024-11-28T12:50:42+5:302024-11-28T12:54:39+5:30

मणिपूरमध्ये अहपरण करुन हत्या केलेल्यांच्या मृतांच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा, खोलवर जखमा झालेल्या आढळून आलं आहे.

Manipur Violence Autopsy report of three including a 10 month old child reveals deep injury marks on the body | डोळे काढले, गुढघ्यावर गोळी मारली अन्... मणिपूरमधल्या ६ जणांच्या हत्येने उडाला थरकाप

डोळे काढले, गुढघ्यावर गोळी मारली अन्... मणिपूरमधल्या ६ जणांच्या हत्येने उडाला थरकाप

Manipur Violence : मणिपूरची भूमीवरुन रोज मानवतेला लाजवेल अशी घटना समोर येत आहेत. मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा निष्पाप जणांच्या हत्येने संपूर्ण देश हादरला आहे. त्यातील तिघांच्या शवविच्छेदन अहवालात समोर आलेली माहिती इतकी भयावह आहे की ती ऐकून अनेकाचा थरकाप उडाला आहे. कुकी दहशतवाद्यांनी या क्रौर्यामध्ये निष्पाप मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही सोडलेलं नाही. मृतांच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा, खोलवर जखमा झालेल्या असून आणि सर्वात वेदनादायक म्हणजे त्यांचे डोळे गायब असल्याचे समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी मणिपूरच्या जिरीबाम जिल्ह्यात कुकी अतिरेक्यांनी अपहरण करून ठार मारलेल्या मैतेयी समाजाच्या सहापैकी तीन जणांच्या शवविच्छेदन अहवालात धक्कादायक खुलासे झाले आहेत. या तिघांमध्ये १० महिन्यांचे मूल, आठ वर्षांची मुलगी आणि ३१ वर्षीय महिलेचा समावेश आहे. सिलचर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये केलेल्या शवविच्छेदनात आढळून आले की १० महिन्यांच्या बाळाच्या डोक्यावर आणि मानेवर गंभीर जखमा होत्या. तसेच ८ वर्षीय मुलीच्या शरीरावर अनेक  जखमा आणि गोळ्या लागल्याच आढळलं आहे.

१० महिन्यांच्या लैश्राम लमंगनबा दोन्ही डोळ्यांचे गोळे गायब होते आणि त्याचे शरीर विरघळलेल्या अवस्थेत होते. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. नराधमांनी त्यांच्या गुढघ्यावरही गोळ्या मारल्या होत्या. आठ वर्षांच्या तेलन थजंगनबीला अनेक गोळ्या लागल्या होत्या आणि पोटात गंभीर दुखापत झाली होती. ३१ तेलम थोईबी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, ज्यात कवटीच्या हाडांनाही मार लागला होता. या तिघांचे शवविच्छेदन अहवाल बुधवारी तर यापूर्वी कुटुंबातील इतर तीन सदस्यांचे अहवाल जाहीर करण्यात आले होते.

तसेच लैशराम बरन मैतेयी आणि मैबम केशो यांच्या शवविच्छेदन अहवालात गंभीर जखमा आणि भाजलेल्या खुणाचांही समावेश आहे. मायबाम केशोच्या उजव्या हातावर आणि त्वचेवर गंभीर भाजलेल्या खुणा आढळल्या. त्याच्या पाठीवर गडद हिरव्या जखमा आणि जखमांच्या खुणा आढळून आल्या. लैशराम बरन मैतेयी यांच्या संपूर्ण शरीरावर खोलवर भाजलेल्या खुणा आढळून आल्या. त्याच्या कवटीची हाडं तुटली होती आणि त्याच्या चेहऱ्याचा आणि तोंडाचा आतील भाग जळाला होता.
 

Web Title: Manipur Violence Autopsy report of three including a 10 month old child reveals deep injury marks on the body

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.