मणिपूर हिंसाचाराचा अंत; सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 06:09 PM2023-11-29T18:09:38+5:302023-11-29T18:12:08+5:30

मणिपूरमधील सर्वात जुन्या सशस्त्र बंडखोर गटाने शांतता करारावर स्वाक्षरी केली आहे.

Manipur violence ends, UNLF signs peace accord; Home Minister Amit Shah's information | मणिपूर हिंसाचाराचा अंत; सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती

मणिपूर हिंसाचाराचा अंत; सर्वात जुन्या मैतेई बंडखोर गटाने शस्त्रे टाकली, अमित शहांची माहिती

Manipur Violence: मागील अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेला हिंसाचार अखेर संपण्याच्या मार्गावर आहे. मणिपूरमधील सर्वात जुना सशस्त्र गट, यूएनएलएफने (UNLF) हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केले आहे. तसेच, UNLF ने शांतता करारावरही स्वाक्षरी केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी बुधवारी(29 नोव्हेंबर) ही माहिती दिली.

गृहमंत्री शाह यांनी त्यांच्या X हँडलवर काही फोटो, व्हिडिओ शेअर केली आहेत, ज्यात सशस्त्र दलातील जवान त्यांची शस्त्रे टाकताना दिसत आहेत. याबाबत अमित शहा म्हणतात की, "ऐतिहासिक घटना, युनायटेड नॅशनल लिबरेशन फ्रंट (UNLF) ने आज नवी दिल्ली येथे शांतता करारावर स्वाक्षरी केली. यामुळे ईशान्येत शांतता प्रस्थापित करण्यासाठी मोदी सरकारच्या अथक प्रयत्नांमध्ये एक नवीन अध्याय जोडला गेला आहे."

गृहमंत्री पुढे म्हणाले, "मणिपूर खोऱ्यातील सर्वात जुना सशस्त्र गट, यूएनएलएफने हिंसाचार सोडून मुख्य प्रवाहात सामील होण्याचे मान्य केले आहे. मी त्यांचे लोकशाही प्रक्रियेत स्वागत करतो आणि शांतता आणि प्रगतीच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. आज भारत सरकार आणि मणिपूर सरकारने UNLF सोबत केलेल्या शांतता कराराने सहा दशकांच्या सशस्त्र चळवळीचा अंत झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या आणि ईशान्य भारतातील तरुणांना चांगले भविष्य प्रदान करण्याच्या प्रयत्नात ही ऐतिहासिक कामगिरी आहे," असे शहा म्हणाले.

Web Title: Manipur violence ends, UNLF signs peace accord; Home Minister Amit Shah's information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.