Manipur Violence : भीषण! मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार, एकाचा मृत्यू; मंत्र्यांच्या घरावर हल्ला, कर्फ्यू लागू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2023 10:03 AM2023-05-25T10:03:44+5:302023-05-25T10:10:40+5:30

Manipur Violence : मणिपूरमधील बिष्णूपूर आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी आणखी हिंसाचार झाला. या वेगवेगळ्या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका राज्यमंत्र्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले.

Manipur Violence man killed biren government minister govinddas konthoujam home vandalised | Manipur Violence : भीषण! मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार, एकाचा मृत्यू; मंत्र्यांच्या घरावर हल्ला, कर्फ्यू लागू

Manipur Violence : भीषण! मणिपूरमध्ये पुन्हा उसळला हिंसाचार, एकाचा मृत्यू; मंत्र्यांच्या घरावर हल्ला, कर्फ्यू लागू

googlenewsNext

मणिपूरमध्ये दोन समुदायांमधील रक्तरंजित हिंसाचार पुन्हा एकदा पाहायला मिळाला आहे. राज्यातील हिंसाचार थांबत नसल्याने परिस्थिती बिघडत आहे. भारतीय लष्करासह, इतर केंद्रीय सुरक्षा दल आणि स्थानिक पोलीस दल मणिपूरमधील परिस्थिती शांत करण्यासाठी सज्ज आहेत. असे असतानाही मैतई आणि कुकी समाजाचे हिंसक आंदोलक शांत बसायला तयार नाहीत.

मणिपूरमधील बिष्णूपूर आणि इम्फाळ पश्चिम जिल्ह्यांमध्ये बुधवारी संध्याकाळी आणखी हिंसाचार झाला. या वेगवेगळ्या घटनांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एका राज्यमंत्र्यांच्या घराला लक्ष्य करण्यात आले. आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात तोडफोड केली आहे. या सर्व घटनांमुळे राज्यातील बिष्णुपूर, इम्फाळ पूर्व, इम्फाळ पश्चिम आणि जिरिबाम जिल्ह्यांमध्ये पुढील आदेशापर्यंत कोणतीही शिथिलता न देता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.

द इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टनुसार, हिंसाचारात मरण पावलेली व्यक्ती बुधवारी सकाळी थम्नापोकपी पायथ्याशी संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या दोघांपैकी एक असल्याचे सांगण्यात आले. या व्यक्तीला इम्फाळ येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला. बुधवारी संध्याकाळी, अचानक जमावाने निंगथौखोंग शहरातील राज्यमंत्री गोविंददास कोन्थौजम यांच्या निवासस्थानावर हल्ला केला. यावेळी हिंसक आंदोलकांनी मंत्र्यांच्या घरातील फर्निचरसह मालमत्तेचे नुकसान केल्याचा आरोप आहे.

मंत्री गोविंददास कोन्थौजम यांना इम्फाळला जावे लागले, त्यामुळे ते घरी नव्हते. मात्र, आंदोलकांच्या हल्ल्यात कुटुंबातील सदस्य जखमी झालेले नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्याच्या सुरुवातीला मणिपूरमध्ये मैतई आणि कुकी समुदायांमधील हिंसक संघर्षात सुमारे 70 लोकांचा मृत्यू झाला आणि 200 हून अधिक जखमी झाले आहेत. या घटनेनंतर आणि गोंधळानंतर हजारो लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
 

Web Title: Manipur Violence man killed biren government minister govinddas konthoujam home vandalised

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.